सनातनच्या कार्यास हिंदुत्वनिष्ठ उद्धव ठाकरे पाठिंबाच देतील !

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत हिंदुत्व जपले. अशा हिंदुत्वाच्या मुशीतच श्री. उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. सनातन संस्था हिंदुत्व आणि हिंदु धर्म यांच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहे. या कार्यात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कार्यामुळे लाखो लोकांना दिशा मिळत आहे. सनातन संस्थेवर आजपर्यंत अनेक आरोप झाले; मात्र त्यातील एकही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही.

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे

त्यामुळे अशा प्रकारे हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या सनातनच्या कार्यास हिंदुत्वनिष्ठ मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे पाठिंबाच देतील, असा आमचा दृढ विश्‍वास आहे.