गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले ह्यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

अनंत आठवले

त्रिगुणांचे अधिक विवेचन, वर्णानुसार कर्मे आणि त्यांचे महत्त्व,
तसेच कोणत्याही साधनेने पराभक्ती (ब्रह्माशी अभिन्नता) प्राप्त होते, हे सांगणारा

अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग

१ उ. सात्त्विक, राजसी आणि तामसी ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती अन् सुख

१ ऊ. चातुर्वर्ण्याची गुणांनुसार कर्मे : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची स्वभावांमुळे उत्पन्न गुणांनुसार वेगवेगळी कर्मे असतात जी पुढे दिली आहेत.

१ ऊ १. वर्णाश्रमानुसार कर्म करण्याचे महत्त्व

अ. ‘ज्या ईश्‍वरापासून सर्व उत्पन्न झाले, त्याची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य ज्ञाननिष्ठेची योग्यतारूपी सिद्धी (आत्मज्ञान मिळण्याची पात्रता) प्राप्त करतो. (अध्याय १८, श्‍लोक ४५ आणि ४६)

आ.  आपले स्वाभाविक कर्म गुणरहित वाटले, तरीही दुसर्‍या वर्णाचे कर्म करू नये. (अध्याय १८, श्‍लोक ४८) (क्रमश:)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘गीताज्ञानदर्शन’