१ जून २०२० पासून देशभरात आता ‘एक देश, एक शिधापत्रिका’ मोहीम ! – केंद्र सरकार

नवी देहली – येत्या १ जून २०२० पासून देशात ‘एक देश, एक शिधापत्रिका (रेशनकार्ड)’ मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत ३ डिसेंबरला दिली. या मोहिमेचा कामगार आणि दुर्बल घटकातील लोकांना लाभ होणार आहे. यामुळे देशातील कोणत्याही भागातून शासकीय दुकानांमधून शिधापत्रकावरील खाद्य सामान घेता येऊ शकणार आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, ही सुविधा ‘ई-पीओएस् मशीन’वर ‘बायोमेट्रिक’ आधारावर अवलंबून आहे. सध्या शिधापत्रिकेसाठी १४ राज्यात ‘पॉश’ यंत्राची सुविधा चालू करण्यात आली आहे. तसेच लवकरच अन्य राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांत ही सुविधा चालू करण्यात येणार आहे.