काँग्रेसचे राहुल गांधी यांनी भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना ‘आतंकवादी’ म्हटल्याप्रकरणी लोकसभा अध्यक्षांकडे केली लेखी तक्रार

नवी देहली – नुकतेच संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात विशेष सुरक्षा विधेयकाच्या चर्चेच्या वेळी डीएम्केचे खासदार ए. राजा यांनी म. गांधी यांच्या हत्येप्रकरणी पं. नथुराम गोडसे यांचा संदर्भ दिला होता. त्यावर भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी तीव्र आक्षेप नोंदवत ‘गोडसे देशभक्त होते’, असे म्हटले होते. त्यावरून संसदेत गदारोळ झाला होता. त्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी संसदेत क्षमायाचनाही केली होती. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी त्यांना ‘आतंकवादी’ म्हटले होते. त्यावरून साध्वी प्रज्ञासिंह यांनी लोकसभा अध्यक्षांकडे ‘विशेषाधिकारांची पायमल्ली’ केल्याची लेखी तक्रार प्रविष्ट केली आहे.