देहलीतील एका बांधकाम क्षेत्रातील आस्थापनाकडून ३ सहस्र कोटी रुपयांचे काळे धन कह्यात

भारतात काळे धन निर्माण न होण्यासाठी सरकारने कठोर कायद्यांसह त्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !

नवी देहली – येथील एन्सीआर्मधील एका बांधकाम क्षेत्रातील (रिअल इस्टेट) समूहाकडून ३ सहस्र कोटी रुपयांचे काळे धन प्राप्तीकर विभागाने घातलेल्या धाडीमध्ये कह्यात घेण्यात आले आहे. या आस्थापनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात काळे धन असल्याची स्वीकृती चौकशीच्या वेळी दिली, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिली.