राष्ट्रपती भवन परिसरातील ‘मुगल गार्डन’चे नाव पालटून राजेंद्र प्रसाद ठेवा ! – हिंदु महासभेची मागणी

स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही देशावर आक्रमण करणार्‍यांची नावे तशीच ठेवणारा जगातील एकमेव देश भारत !

नवी देहली – राष्ट्रपती भवन परिसरात असलेल्या ‘मुगल गार्डन’चे नाव पालटून भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचे नाव ठेवावे, अशी मागणी हिंदु महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणि यांनी केले आहे. याविषयी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटू इच्छितो.