पाकमध्ये हिंदुद्वेषाची गरळ ओकणार्‍यास पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून पुन्हा मंत्रीपद

पाकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून हिंदुद्वेष्ट्यांचा अशा प्रकारे सन्मान केला जातो, हेच यातून दिसून येते ! अशा पाकला त्याची जागा दाखवणे आवश्यक !

लाहोर (पाकिस्तान) – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हिंदूंच्या विरोधात विधाने करणार्‍या फैयाज उल हसन चौहान यांना पुन्हा एकदा पंजाब प्रांताचे माहिती मंत्री बनवले आहे. त्यांना मार्च मासामध्येच हिंदुविरोधी विधाने केल्याने याच पदावरून हटवण्यात आले होते. त्या वेळी हिंदुविरोधी विधाने केल्यामुळे इम्रान खान यांनी त्यांचे कौतुकही केले होते. (केवळ हिंदूंना खुश करण्याचे ढोंग करणारे इम्रान खान यांचा खरा तोंडवळा यातून उघड होतो ! – संपादक)