आस्थापनाकडून १७० कोटी रुपये स्वीकारणार्‍या काँग्रेसला आयकर विभागाकडून नोटीस

नवी देहली – आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला एका आस्थापनाकडून १७० कोटी रुपये स्वीकारल्याच्या प्रकरणात स्पष्टीकरण देण्याची नोटीस बजावली आहे. आयकर विभागाने ३ सहस्र ३०० कोटी रुपयांच्या हवाला रॅकेटच्या प्रकरणी करचोरीच्या चौकशीवरून ही नोटीस पाठवली आहे. (केवळ नोटीस न बजावता संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)