६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. सुधाकर जोशीआजोबा (वय ९० वर्षे) यांना सुचलेली कविता

श्री. सुधाकर के. जोशी

भगवंता घे अवतार भूवरी, रामराज्य येऊ दे लवकरी ।
हे गोपाळा, दाखव रे तुझी सुवर्ण द्वारका, सुदर्शनधारका ।
‘यदा यदा हि धर्मस्य…’ असे तूच सांगतोस ना ।
केव्हा घेतोस अवतार सांग ना ॥ १ ॥

तुझ्या हातात आहे गदा ।
बलात्कार्‍यांना देत नाहीस दणका ।
देवा जगात काय चालले, ते तू पाहतोस ना ॥ २ ॥

मोठमोठ्या पुढार्‍यांनी ।
किती घोटाळे केलेत, ठाऊक आहे ना ।
म्हणून म्हणतो, घे अवतार भूवरी ।
रामराज्य येऊ दे लवकरी ॥ ३ ॥

अधर्मियांसाठी घेऊन ये गदा ।
धाव लवकरी आता तू गोविंदा ।
अजून मला जगायचे आहे ।
‘हिंदु राष्ट्र’ बघायचे आहे ॥ ४ ॥

– श्री. सुधाकर जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.८.२०१९)