
सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले ह्यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.
॥ श्रीकृष्णाय नम: ॥
सात्त्विक, राजसी आणि तामसी आचरण; श्रद्धेचे महत्त्व, तसेच ‘ॐ’, ‘तत्’ आणि ‘सत्’ या शब्दांचे विवरण सांगणारा
अध्याय १७ – श्रद्धात्रयविभागयोग
२. साधना
अ. पूजा, आहार, यज्ञ, तप आणि दान यांच्यातील सात्त्विक, राजसी अन् तामसी भेद नीट समजून घेऊन ही कर्मे असात्त्विक, राजसी, तसेच तामसी होऊ न देणे
आ. यज्ञ, दान आणि तप आदी सत्कर्मे फळांची इच्छा न ठेवता करणे
इ. सात्त्विक कर्मे श्रद्धेने करणे
३. फळ
सात्त्विक कर्मे श्रद्धेने केल्यास ईश्वराशी योगाची, म्हणजे जुडण्याची योग्यता प्राप्त होणे आणि हळूहळू चित्तशुद्धी होऊन मोक्षप्राप्ती होणे.
४. अध्यायाचे नाव ‘श्रद्धात्रयविभागयोग’ असण्याचे कारण
तीन प्रकारच्या श्रद्धांचे विवरण देऊन सात्त्विकी श्रद्धा अंगीकारण्यानेच सत्शी (परमात्म्याशी) योग होऊ शकेल हे स्पष्ट केले आहे, म्हणून ह्या अध्यायाचे नाव ‘श्रद्धात्रयविभागयोग’ आहे. (क्रमश:)
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘गीताज्ञानदर्शन’