अमेरिकेत अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात ११ घायाळ, २ जण गंभीर

न्यूयॉर्क – अमेरिकेच्या न्यू ऑरलिन्स शहरातील फ्रेंच क्वार्टर या उच्चभ्रू वस्तीतील कॅनल स्ट्रीटवर १ डिसेंबरला एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. त्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ११ जण घायाळ झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. या परिसरात देशी-विदेशी पर्यटकांची प्रचंड वर्दळ असते. घटनास्थळाच्या आवारात काही तारांकित उपाहारगृहे असून तेथे अनेक पर्यटक राहतात.

या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला कह्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेत आतंकवादी संघटनेचा हात आहे का ?, याचा तपास पोलीस करत आहेत.