प्रगल्भ आणि सेवेची आवड असलेली कु. प्रेरणा पाटील !

१. साधनारत आणि ईश्‍वराप्रती भाव असलेले पाटील कुटुंब !

कु. प्रेरणा पाटील

 

कु. प्रेरणा तासगाव (जिल्हा सांगली) येथील असून रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आली आहे. तिच्या घरी तिचे आई-वडील, आजी-आजोबा आणि तिचा लहान भाऊ आहे. तिच्या भावाची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे. तिचे वडील शेती करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तिचे वडील दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण आणि प्रसार, या सेवा करतात. त्यांना सेवेला कधीही बोलावले, तरी ते येतात. ते चांगली सेवा करतात. तिची आई मिरज आश्रमात आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभा, तसेच गुरुपौर्णिमा यांवेळी सेवेसाठी जाते. त्या दोघांचाही ईश्‍वराप्रतीचा भाव चांगला आहे.

२. कु. प्रेरणा हिची गुणवैशिष्ट्ये

कु. स्वाती गायकवाड

२ अ. सेवेची आवड : प्रेरणा शाळेत असतांना सात्त्विक उत्पादनांचे वितरण आणि धर्माचरणाचे महत्त्व सांगायची. दिवाळीच्या वेळी आश्रमातून घरी गेल्यावर तिने जिल्ह्यातील युवा शिबिरात चांगली सेवा केली. रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी ती देवद आश्रमात गेली होती. तेथेही तिने चांगली सेवा केली.

२ आ. प्रेरणाची प्रगल्भता आणि साधनेचे प्रयत्न चांगले आहेत.

२ इ. जाणवलेला पालट : प्रारंभी तिला ‘चुका सांगणे, बोलणे’ यांची भीती वाटायची. आता ती बोलते.’

– कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.११.२०१९)