श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी… हिंदूंचा शतकानुशतके रक्तरंजित लढा !

हिंदूंचा संघर्ष कशासाठी …? हिंदूंचे श्रद्धास्थान जपण्यासाठी…

श्रीरामजन्मभूमीसाठी वर्षानुवर्षे चालू असलेल्या लढ्यात अनेकांनी यात बलीदान दिले असले, तरी कोणाचे प्राण मात्र कधी घेतलेले नाहीत. हिंदूंनी या लढ्याद्वारे श्रीरामाला साद घातली असून त्यानेच यश दिले आहे !

१. रामजन्मभूमी नष्ट करण्याचे शाही फरमान

बाबराच्या ‘शाही फरमानात’ म्हटले होते, ‘शाहंशाहे हिंद मालिकूल जहां बादशाह बाबर आणि हजरत जलालशाह यांच्या आदेशानुसार रामजन्मभूमीला नष्ट करून त्याच साहित्याने तेथे मशीद बांधण्याची अनुमती आहे. अयोध्येव्यतिरिक्त हिंदुस्थानातील इतर कोणताही हिंदु अयोध्येला पोचू नये. शंका वाटल्या संबंधित व्यक्तीला ठार मारावे. याची कार्यवाही करणे कर्तव्य समजावे. यावरून लक्षात येते की, तत्कालीन शासन समजत होते की, राममंदिर तोडून मशीद बांधणे सोपे नाही.

२. बाबराचा वजीर मीरबांकी याची क्रूरता !

युद्ध करतांना १ लाख ७४ सहस्र हिंदू मारले गेले आणि त्यांच्या मृतदेहाचा ढिग लावला गेला. त्या वेळी बाबराचा वजीर ‘मीरबांकी’ याने तोफेच्या साहाय्याने रामजन्मभूमी येथील मंदिर पाडले.

३. मशीद बांधकामात हिंदूंच्या रक्ताचा वापर !

जलालशाहने हिंदूंच्या रक्ताने गार करून ‘लाहौरी’ विटेचा वापर मशिदीसाठी केला. मशीद बांधण्याची प्रेरणा देणारा तास्सुन्न मुसलमान फकीर कजल अब्बास मुसा अशिकान कलन्दर साहब याला अयोध्येला मक्केचे स्वरूप द्यायचे होते.

४. क्षत्रियांचा रामजन्मभूमी मुक्तीसाठी लढा !

कलंदरच्या अनुमतीने राममंदिर नष्ट करून त्या साहित्याने मशीद बांधली. १० सहस्र सूर्यवंशीय क्षत्रिय रामजन्मभूमीच्या रक्षणासाठी एकत्र आले; पण शाही सेनेने त्यांना युद्धात मारले.

५. अकबराच्या काळात मंदिरासाठी चौथरा

अकबराच्या काळामध्ये क्षत्रियांनी आक्रमण केल्यावर झालेल्या लढाईत हिंदूंनी शाही सेनेचा पाडाव करून मशिदीसमोर मंदिरासाठी कट्टा केला; पण हिंदु जनतेच्या हृदयाला धक्का पोचू नये, यासाठी अकबराने तेथे श्रीरामाची प्रतिमा स्थापण्याची आज्ञा केली.

६. औरंगजेबाचे रामजन्मभूमीवर आक्रमण !

शाहजहाँचा मुलगा महीयुद्दीन आलमगीर औरंगजेब हिंदूंचा द्वेष करणारा क्रूर शासक होता. गादीवर बसल्यावर त्याने सेना अयोध्येला पाठवली. हिंदूंनी मूर्ती आणि पूजेचे साहित्य लपवले. रात्री गावांत फिरून आक्रमणाची सूचना दिली. हिंदूंची कणखर तुकडी रामजन्मभूमीवर आली. रामदासस्वामींचे शिष्य ‘वैष्णवदास’ यांच्यासमवेत १० सहस्र चिमटाधारी साधूंचे दल होते. आक्रमणाची सूचना मिळाल्यावर ते हिंदूंच्या तुकडीला जाऊन मिळाले. त्यांनी मोगल सैन्याचा विरोध केला. शाही सेनेने पळ काढला.

७. हिंदू-शीख यांच्याकडून मोगलांचा पाडाव

क्रोधित औरंगजेबाने हसन अली याला ५० सहस्र सैन्य देऊन रामजन्मभूमी नष्ट-भ्रष्ट करण्यासाठी पाठवले. वैष्णवदासांनी गुरु गोविंदसिंह यांच्याकडून शिखांची सेना घेऊन शाही मोगल सेनेला मारून पळवले. हसन अली युद्धात मारला गेला.

८. रामजन्मभूमी कह्यात घेणारा औरंगजेब !

४ वर्षांनी औरंगजेबाने पुन्हा केलेल्या आक्रमणात शाही सेनेने १० सहस्र हिंदूंची हत्या केली. त्यांचे मृतदेह विहिरीत भरून चारही बाजूंनी भिंत बांधली. शाही सेनेने रामजन्मभूमीचा कट्टा खोदून त्याला गडाचे रूप दिले.

९. रामजन्मभूमीची मुक्ती आणि हिंदू !

नवाब सहादत अली खाँ गादीवर बसल्यावर हिंदूंनी पुन्हा रामजन्मभूमीच्या प्राप्तीसाठी आक्रमण केले; परंतु ते पराभूत झाले. नवाब नसिरूद्दीन हैदर गादीवर बसल्यावर हिंदूंनी पुन्हा आक्रमण केले. साधूंच्या चिमटाधारी सैन्याने हिंदु विरांच्या सेनेसमवेत शाही सेनेला मार देऊन पळवले आणि रामजन्मभूमी हिंदूंच्या अधिकारात घेतली; मात्र शाही सेनेने पुन्हा येऊन रामजन्मभूमी बळकावली.

१०. हिंदु राजांनी धर्मांधांना पळवले !

नवाब वाजीद अलीशाहच्या वेळी हिंदूंंनी केलेल्या दोन दिवसांच्या युद्धात धर्मांध पराभूत झाले. अयोध्येचा महाराजा मानसिंह याने हिंदूंना रामजन्मभूमीवर पुन्हा चौथरा बांधण्याची आज्ञा दिली. चौथर्‍यावर गवताच्या काड्यापासून उंच मंदिर सिद्ध करून प्रतिमा स्थापन केली गेली.

११. इंग्रजांच्या काळात दोनदा रामजन्मभूमी मुक्तीसाठी लढा

अ.  इंग्रजांच्या सत्ताकाळात पहिले आक्रमण १९१२ मध्ये झाले. या आक्रमणात बाबरीला कोणतीही हानी पोचू दिली नाही.

आ. दुसरे आक्रमण वर्ष १९३४ मध्ये झाले. या आक्रमणामध्ये बाबरी ढाचा तोडून टाकला. फैजाबादमधील उपायुक्त जे.पी. निकलसन याने मशीद पुन्हा बांधली. बाबरीच्या एका स्थानावर लिहिले होते की, २७.३.१९३४ अनुसार जीउल हिज्जा सन १३५२ हिजरी(मुसलमान कालगणना वर्ष या अर्थाने) या दिवशी हिंदूंनी नष्ट केलेली मशीद तहव्वर खाँ या ठेकेदाराने अत्यंत चलाखीने पुन्हा बांधली.

१२. रामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी हिंदूंचा ७७ वेळा लढा !

वर्ष  १९९२ मधील ६ डिसेंबर या दिवशी बाबरी मशिदीवर जे काही झाले, त्यासंदर्भात सर्व लोक परिचित आहेत. रामजन्मभूमीच्या उद्देशाने आजपर्यंत ७७ आक्रमणे झाली आहेत. बाबरच्या काळात ४, हुमायूच्या काळात १०, औरंगजेबच्या काळात ३०, शहादत अलीच्या काळात ५, नसिरूद्दीन हैदरच्या काळात ३, वजिद अलीच्या काळात २, इंग्रजांच्या काळात २, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काळात एक वेळा, एवढा मोठा हा लढा होता.

– गुरुकुल झज्जर, हरियाणा