रामजन्मभूमी निकालाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी केलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी आवाहन !

अयोध्या येथील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत्या काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी न्यायालयाच्या निकालानंतर ‘नागरिकांनी सामाजिक संकेतस्थळांवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नये’, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या आवाहनासोबत पोलिसांनी पुढील सूचना केल्या आहेत –

१. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक किंवा इतर सामाजिक प्रसारमाध्यमे यांवर टीकाटिपणी, पत्रकबाजी करणे हे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारे ठरू शकते. यामुळे सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया देणार्‍यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील, अशा प्रकारचे संदेश प्रसारित करणे, प्राप्त झालेले संदेश ‘लाईक’ किंवा ‘शेअर’ करणे, तसेच त्यावर ‘कमेंट’ (प्रतिक्रिया देणे) करणे टाळावे.

२. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व भारतीय नागरिकांनी पाळणे बंधनकारक आहे. न्यायालयाच्या निकालाविषयी कोणतीही टिपण्णी करू नये.

३. कुठेही जमाव करून थांबू नये.

४. निकालानंतर गुलाल उधळू नये, तसेच फटाके वाजवू नयेत. सायलेन्सर काढून गाड्या पळवू नयेत.

५. मिरवणुका आणि रॅली काढणे, तसेच वाद्ये वाजवणे, भाषणे, घोषणाबाजी किंवा जल्लोष करणे टाळावे.

६. निकालानिमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटू नये.

७. महाआरती अथवा समूह पठण याचे आयोजन करू नये.

८. धार्मिक भावना दुखावतील, असे कोणतेही कृत्य करू नये.

९. जातीय दंगलीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे जुने व्हिडिओ आणि छायाचित्रे पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये.

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना

पोलिसांनी केलेल्या वरील आवाहनाचे सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी काटेकोर पालन करावे. पोलिसांनी मनाई केलेल्या गोष्टींच्या विरोधात कृत्य करण्यासाठी (उदा. महाआरती करणे, मिरवणुकीत सहभागी होणे, साखर / पेढे वाटणे) कोणीही आपल्याला आवाहन करत असल्यास पोलिसांनी वर दिलेल्या सूचनांचा नम्रपणे संदर्भ देऊन अशा कृतीत सहभाग घेणे टाळावे.