पाकनंतर आता नेपाळकडून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांच्या नकाशावर आक्षेप

काठमांडू (नेपाळ) – भारताने नव्याने जारी केलेल्या जम्मू-काश्मीर आणि लडाख यांच्या नकाशावर पाकने आक्षेप घेतल्यानंतर आता नेपाळने आक्षेप घेतला आहे. भारताने या नकाशामध्ये ‘कालापानी’ हा भाग भारतात दाखवल्यावरून नेपाळने अधिकृतरित्या आक्षेप घेतला आहे. हा भाग नेपाळचा अविभाज्य भाग आहे, असे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. यानंतर भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. या मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दोन्ही देशांतील विदेश मंत्र्यांच्या स्तरावरील संयुक्त समितीकडे या प्रश्‍नावर उत्तर काढण्याचे दायित्व देण्यात आले आहे.