बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे शनिदेवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

उत्तरप्रदेशात अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

देशात अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळाच्या विरोधात एखादी घटना घडली, तर देशात ती राष्ट्रीय बातमी ठरते, तर हिंदूंच्या धर्माविषयी अशा घटना घडल्या, तर त्याची कोणीही दखल घेत नाहीत !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथील फिरोजपूर गावामधील प्राचीन शिव मंदिरातील पिंपळाच्या झाडाखाली असणारी शनिदेवाची मूर्ती अज्ञातांकडून तोडण्यात आली. रात्रीच्या वेळी ही घटना घडली. सकाळी गावातील नागरिक स्वच्छतेसाठी मंदिरात आल्यानंतर हे निदर्शनास आले. यानंतर मोठ्या संख्येने गावकरी मंदिराजवळ जमले आणि त्यांचा संताप व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन नागरिकांना शांत केले. पोलीस तोडफोडीच्या घटनेची चौकशी करत आहेत.

उपविभागीय अधिकार्‍यांच्या मते दारूड्या व्यक्तींकडून ही तोडफोड करण्यात आली आहे. गावकर्‍यांनी आम्हाला सांगितले की, दारूडे नेहमी येथे दारू पिण्यासाठी येत होते आणि कुरापती करत होते. यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकार्‍यांनी सांगितले आहे. (हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती फोडणार्‍यांना एकतर मनोरुग्ण किंवा दारूडे ठरवून अशा प्रकरणांवर पडदा टाकण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जातो. अन्य पंथियांच्या संदर्भात असे कधी घडल्याचे ऐकिवात नाही ! – संपादक)