प्रभु श्रीरामचंद्रांच्या मंदिर उभारणीचा सुवर्णक्षण दृष्टीक्षेपात !

प्रतिदिन वाचा राममंदिराविषयी लेखमाला

  गेल्या ५ शतकांपासून हिंदूंच्या २५ हून अधिक पिढ्या ज्या मंदिराच्या उभारणीची चातकाप्रमाणे वाट पाहत आल्या आहेत, ज्या सहस्रावधी हिंदूंनी प्रभु श्रीरामाला आपल्या जीवनाचे सर्वस्व मानून त्याच्यासाठी बलीदान दिले, ज्या कोट्यवधी हिंदूंनी आपले आराध्य ‘जानकीवल्लभा’च्या मंदिरासाठी भावपूर्ण प्रार्थना केल्या, उपासना केली, जीवनभर व्रतस्थ राहिले, तो ऐतिहासिक क्षण आज काळाचे द्वार ठोठावत आहे. भविष्यातील तो भावविभोर करणारा सुवर्णक्षण दृष्टीस पडत आहे. होय ! विषय आहे, रामजन्मभूमीचा, अयोध्येतील श्रीराममंदिर उभारणीचा !

    १७ नोव्हेंबर या दिवशी भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्ती आधीच म्हणजे १७ नोव्हेंबरपूर्वी रामजन्मभूमीविषयीचा निर्णय होणार आहे. या निर्णयाला आधुनिक नि स्वतंत्र भारताच्या ७० वर्षांच्या इतिहासातील सर्वांत मोठा निर्णय मानले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रतिदिन आपण राममंदिराचा इतिहास, त्यासंदर्भात झालेल्या ऐतिहासिक घडामोडी, विविध संत, तज्ञ आदींचे तेजस्वी विचार आदी वैशिष्ट्यपूर्ण माहिती पाहणार आहोत.

कुठे हिंदु देवतेची जगातील सर्वांत मोठी मूर्ती उभारणारा ‘इस्लामी’ मलेशिया आणि कुठे रामजन्मभूमीत राममंदिर बांधण्यास अनुमती नाकारणारे हिंदु भारतातील अधर्मी काँग्रेसी !

‘मलेशियातील बाटू केव्ह येथे हिंदु देवता कार्तिकस्वामी (मुरुगन) यांची १४० फूट उंचीची मूर्ती आहे. हिंदु देवतेची जगात एवढी उंच मूर्ती कुठेच नाही, असे म्हणतात. ही मूर्ती बनवण्यासाठी २५० टन स्टील आणि ३०० लीटर सोने आणि अन्य धातू लागले. या मूर्तीच्या शेजारी गुहा असून तेथे या देवतेचे देऊळ आहे. या देवळात जाण्यासाठी २७२ पायर्‍या चढाव्या लागतात. प्राचीन काळापासून ही गुहा जशी आहे, तशीच जतन करण्यात आली असून तिच्यात कोणतेही परिवर्तन वा तिची डागडुजी करण्यात आलेली नाही. मात्र गुहेतील मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.’ (तरुण भारत, १७.१.२०११)

राममंदिर ऐतिहासिक सत्य आणि पुराव्याने सिद्ध असे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे, ते काही मतांसाठी ‘बाबरी’वर असलेले राजकारण्यांचे बेगडी प्रेम नव्हे !

‘राममंदिर हे एक ऐतिहासिक सत्य, पुरावासिद्ध आणि श्रद्धास्थान आहे. ऐतिहासिक सत्य आणि पुरावे यांनी हिंदूंच्या या श्रद्धास्थानाला सत्य ठरवले आहे, त्याला दुसरा कोणी काय करू शकणार ? पुराव्यांना नष्ट करणार का ? ए.एस्.आय्. च्या अहवालाकडे दुर्लक्ष करणार का ? देश-विदेशातील लाखो विद्वानांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले विवेचन, अहवाल निष्फळ बडबड मानणार का ? कि ते खोटे ठरवणार ? ज्याप्रमाणे बाबरी मशिदीच्या निर्माणाचा हेतू हा राजकारणाचा एक भाग होता, तसेच ती पडल्यावर नेत्यांनी व्यक्त केलेला विलाप हासुद्धा राजकारणाचाच भाग होता. एकगठ्ठा मतांची हाव, हेच त्यांचे बाबरी मशिदीवरचे प्रेम आहे.’

– हृदय नारायण दिक्षित (मासिक ठेंगेपर सब मार दिया, ऑक्टोबर २०१०)