दुसर्‍याला पालटण्याचा प्रयत्न कुठपर्यंत करावा ?

प.पू. आबा उपाध्ये आणि प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘कुठल्याही गोष्टीतून परमेश्‍वरी शक्ती किंवा सूर्यशक्ती जाण्यास शरीर शुद्ध असावे लागते. त्या शरिराला धर्म असावा लागतो. या गृहस्थाच्या शरिरात आणि मनात अधर्माचे राज्य चालू असून त्याचे संपूर्ण शरीर त्रासून टाकलेले आहे. त्याला उपाय एकच आणि तो म्हणजे त्याच्या मनाची खंबीरता वाढवावी आणि त्याच्या पत्नीने आपल्या युक्ती-प्रयुक्तीने त्याला समजावून सांगावे किंवा कुठल्याही एका युक्तीवादाच्या दहशतीने त्याला दडपणाखाली ठेवावे. तसेच घरच्या मंडळींनी त्याच्या शरीरधर्मातील न्यूनगंड पाहून, निरखून त्याच पद्धतीच्या धाकधपटशाने त्याला तालावर आणावे.

इतके सांगूनसुद्धा त्या माणसाला जिवाची पर्वा नसल्यास आपण किती पर्वा करायची ? जो स्वतःच्या जिवाची पर्वा करीत नाही, तो कुटुंबाची किती करणार ? जो आपली पर्वा करत नाही, त्याची आपण किती करणार ? जो ऐकू शकत नाही, त्याला आपण किती ओरडून सांगायचे ?’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून) (२९.४.१९८४)