राममंदिरप्रश्‍नी निकाल घोषित होण्याच्या कालावधीत घ्यावयाची काळजी !

साधकांना सूचना, वाचक, हितचिंतक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना विनंती !

‘राममंदिरप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठापुढे सुनावणी पूर्ण झाली असून सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई निवृत्त होण्यापूर्वी, म्हणजे १७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाकडून या प्रश्‍नाचा निकाल दिला जाईल. या निकालानंतर सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची आहे, हे लक्षात घेऊन ५ नोव्हेंबरपासून साधारण नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत सर्व हिंदूंनी पुढील प्रकारे काळजी घ्यावी.

१. या काळात प्रवास करतांना पुरेशी काळजी घ्यावी.

२. रात्रीचा प्रवास आवश्यक असल्यासच करावा. ज्या भागात अशांतता असेल, त्या भागात प्रवास करू नये.

३. ज्या भागात प्रवास करणार, तेथील परिस्थितीविषयी साधक, हिंदुत्वनिष्ठ आणि हितचिंतक यांच्याकडून माहिती घ्यावी.

४. या काळात सार्वजनिक ठिकाणी उपक्रम करतांना पोलीस-प्रशासन यांच्याकडून प्रतिबंधात्मक आदेश घोषित झालेले असतील, हे लक्षात घेऊन सार्वजनिक उपक्रमांचे नियोजन करावे.

५. आपल्या परिसरातील पोलीस ठाणे, रुग्णालये आणि आपत्कालीन यंत्रणा यांचे संपर्क क्रमांक सर्वांना दिसतील, असे घर, कार्यालय, दुकाने, सार्वजनिक मंडळे आदी ठिकाणी लावावेत.