गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे १२ गायींचे कत्तलीपासून रक्षण

यावरून केवळ गोवंश हत्याबंदी कायदा करून उपयोग नाही, तर त्याची प्रभावी कार्यवाही होणेही आवश्यक आहे !

कराड, ३ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील जनावरांच्या बाजारात एका टेम्पोत १२ गायी विक्रीसाठी घेऊन जातांना गोरक्षक श्री. प्रतीक ननावरे आणि श्री. वैभव जाधव यांच्या निदर्शनास आले. गोरक्षकांनी ही घटना पोलिसांना कळवून पोलिसांच्या साहाय्याने या टेम्पोची पाहणी केली असता या गायी कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले.

यावर पोलिसांनी तात्काळ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद करून सर्व गायी ‘श्री भगवान महावीर गोपालन संस्था, घोलपवाडी, मसूर’ येथे पाठवून दिल्या.

या संदर्भात घटनाक्रम असा की,

१. येथील गुरांच्या बाजारात ३१ ऑक्टोबर या दिवशी आयशर टेम्पोतून (क्रमांक एम्.एच्. १२, ई.एफ्. ५१९२) गायी घेऊन जात असल्याचे गोरक्षक श्री. प्रतीक ननावरे आणि श्री. वैभव जाधव यांच्या लक्षात आले. ही माहिती मानद पशूकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी यांनी संबंधित पोलिसांना देऊन योग्य ती कारवाई करण्यासाठी दूरभाष केला.

२. हा टेम्पो थांबवून पोलिसांच्या कह्यात दिल्यावर त्यात १२ गायी दाटीवाटीने कोंबल्याचे दिसून आले. यातील ३ गायींचे पाय आणि तोंड टेम्पोच्या कडेला लोखंडी बारला बांधून ठेवण्यात आले होते.

३. टेम्पोचालकास पोलिसांनी अधिक माहिती विचारल्यावर त्याने स्वत:चे नाव फिरोज रज्जाक खान असे सांगून गुरांच्या बाजारात दोन व्यापार्‍यांनी या गायी टेम्पोत भरून दिल्या आणि त्या कलेढोण येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.

४. यावर पोलिसांनी तात्काळ पुढील कायदेशीर कारवाई केली. या प्रकरणी मानद पशूकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी, अधिवक्ता राजू गुप्ता, गोरक्षक श्री. अनिल कडणे, गोभक्त श्री. संजीव शहा, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, सनातनचे साधक या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.