सैन्यातील अधिकारी महिला प्रशिक्षणार्थींना पाठवायचा अश्‍लील व्हिडिओ

सैन्याला कठोर प्रशिक्षण देतांना नैतिकतेचेही शिक्षण द्यायला हवे, हेच यातून लक्षात येते !

नवी देहली – सैन्यातील एका मेजर जनरलने राष्ट्रीय छात्र सेनेच्या (‘एन्सीसी’च्या) महिला प्रशिक्षणार्थींना अश्‍लील व्हिडिओ (क्लिप) पाठवल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी एका महिला प्रशिक्षणार्थीने त्या अधिकार्‍याची वरिष्ठांकडे तक्रार केली असून त्याच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पश्‍चिमेकडे तैनात असलेल्या या अधिकार्‍यावर ‘एन्सीसी’च्या महिला प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याचेही दायित्व देण्यात आले होते. या वेळी त्या अधिकार्‍याच्या संपर्कात येणार्‍या महिला प्रशिक्षणार्थींना तो अश्‍लील व्हिडिओ पाठवत असे. सैन्याकडून त्या अधिकार्‍यावर लवकरच ‘कोर्ट मार्शल’ची कारवाई करण्यात येणार आहे.