मीरारोड (ठाणे) येथे महिलांची छेड काढल्याची पोलिसांत तक्रार करणार्‍या युवकांवर धर्मांधाने केले आक्रमण

अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले धर्मांध !

मुंबई – मद्यपान करून तरुणींची छेड काढल्याची पोलिसांत तक्रार करणार्‍या युवकांवर धर्मांधासह अन्य एकाने तलवारीने आक्रमण केले. या आक्रमणात येथील गीतानगरमधील सचिन सिंह आणि रोहन सिंह हे सख्खे भाऊ गंभीर घायाळ झाले. या विरोधात सोसायटीमधील लोकांनी नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नोमान सैय्यद आणि बंटी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’च्या चित्रणावरून आरोपींना अटक केली.

मागील काही वर्षांपासून येथील एका पडक्या इमारतीमध्ये काही युवक रात्रभर मद्यपान करत असल्याची, तसेच येणार्‍या-जाणार्‍या महिलांची छेड काढत असल्याची तक्रार येथील स्थानिकांनी पोलिसांत केली होती. या नियमितच्या त्रासामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त होते.