काश्मीरच्या सूत्रावरून भारताला पाठिंबा देणार्‍या ब्रिटीश महिला पत्रकाराशी धर्मांधांचे असभ्य वर्तन !

लंडन – येथे पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या धर्मांधांनी २७ ऑक्टोबर या दिवशी म्हणजेच दिवाळीत भारतविरोधी मोर्च्याचे आयोजन केले होते. या वेळी मोर्च्याच्या ठिकाणी पोचलेल्या ब्रिटनच्या सुप्रसिद्ध महिला पत्रकार केटी हॉपकीन्स यांना धर्मांधांनी धक्काबुक्की केली. धर्मांधांनी अपशब्द वापरून त्यांचा अवमानही केला. या वेळी हॉपकीन्स यांना घेरण्यात आले; परंतु घटनास्थळी वेळेत आलेल्या लंडन पोलिसांमुळे पुढील अनर्थ टळला.

हॉपकीन्स यांचा काश्मीरच्या सूत्रावरून भारताला पाठिंबा आहे.

हॉपकीन्स या वेळी म्हणाल्या, ‘‘भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझा पाठिंबा आहे, हे दर्शवण्यासाठी मी मोर्च्याच्या ठिकाणी गेले होते. हे दु:खद आहे की, पाकिस्तान्यांना दिवाळीच्या दिवशी मोर्चा करण्यासाठी अनुमती मिळाली. मी पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनमध्ये शांततेने राहणारे भारतीय यांच्यासमवेत आहे.’’ हॉपकीन्स यांनी या घटनेचा व्हिडिओही सामाजिक प्रसारमाध्यमांवर (‘सोशल मीडिया’वर) प्रसारित (शेअर) केला आहे.