सजावी आपुली दीपावली या दीपांनी ।

श्रीविष्णुपाद प्रतिष्ठापूया अंतरी । श्रीलक्ष्मी येईल स्वये चालूनी ॥ १ ॥

पूजन लक्ष्मीसह नारायणाचे मनमंदिरी । करूया ते यथासांग भाव ठेवोनी ॥ २ ॥

षड्रिपूनिर्मूलन-हरिस्मरण-गुरुचरण । सजावी आपुली दीपावली या दीपांनी ॥ ३ ॥

सर्व साधक बंधू-भगिनींना दीपावलीनिमित्त भावपूर्ण नमस्कार !

– श्री. संदीप शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (२७.१०.२०१९)