भाऊबिजेच्या दिवशी प.पू. आबा उपाध्ये यांनी सनातनच्या पुण्यातील साधिका सौ. रश्मी नाईक यांच्याकडून ओवाळून घेऊन असा साजरा केला आनंदमय सोहळा !

‘प.पू. आबा उपाध्ये यांनी सनातनच्या साधिकेला ही संधी, म्हणजे आशीर्वादच दिल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

प.पू. आबा उपाध्ये आणि प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

१. भाऊबिजेच्या दिवशी ओवाळण्यासाठी बहीण मुंबईहून येणे कठीण असल्याने ‘त्यासाठी सनातनच्या साधिका सौ. रश्मी नाईक यांना बोलावूया’, असा विचार येणे आणि त्यांनीही ते आनंदाने मान्य करणे

‘आमच्या घरी पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथेप्रमाणे दिवाळीच्या अगदी कडक थंडीतही आनंदोत्सव साजरा केला जातोे. ‘भाऊबिजेच्या दिवशी घरातील एकाही व्यक्तीने ओवाळून घेतल्याविना किंवा ओवाळल्याविना रहायचे नाही’, अशी प्रथा आहे. घरात असलेल्या सर्व लहान-मोठ्या व्यक्ती एकमेकांना ओवाळतात. मी या वर्षीही ही प्रथा पाळून भाऊबिजेच्या दिवशी आनंद मिळवला. माझी बहीण मुंबईतील कफ परेड या भागात राहते. या दिवाळीत तिची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे ‘काय करायचे ?’, ते मला सुचत नव्हते. अकस्मात माझ्या मनात आले (कदाचित पत्नीने (कै. प.पू. सौ. मंगला उपाध्ये यांनी सुचवले असेल), ‘रश्मीताईंना (सनातनच्या साधिका सौ. रश्मी नाईक यांना) बोलवूया.’ मी माझ्या मुलीला ‘त्यांना वेळ आहे का ?’, ते विचारायला सांगितले आणि रश्मीताईंनी घरी येण्याचे आनंदाने मान्य केले.

२. अशी झाली भाऊबिजेची ओवाळणी !

रश्मीताई रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आमच्या घरी आल्या. त्यांनी मला शास्त्रशुद्ध पद्धतीने ओवाळले. मीही मनात पत्नीचे स्मरण करून रश्मीताईंना यथोचित ओवाळणी दिली. त्यांची खणा-नारळाने ओटी भरण्यासाठी त्यांच्याच हातात ओटी देऊन मी त्यांना ‘पत्नीच्या प्रतिमेला लावून आपण ही ओटी घ्या’, असे सांगितले. सौ. रश्मी नाईक यांच्यासह त्यांचे पती श्री. प्रवीण नाईक हेही आले होते. त्यांनी मला सदर्‍याचे कापड दिलेे आणि माझ्या सदर्‍याचे माप घेऊन त्याचा सदरा शिवून आणूनही दिला. हे सर्व ‘प.पू. सदानंद स्वामी यांनी माझ्या पत्नीच्या साहाय्याने घडवून आणले’, असे मला वाटते.

‘सनातनच्या साधिकेने मला ओवाळले’, याचा मला पुष्कळ आनंद झाला. हे घडवून आणणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्रिवार धन्यवाद ! जय हिंदु राष्ट्र !’

– प.पू. आबा उपाध्ये, पुणेे (२१.११.२०१८)