गुरुदेव, जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधनामुळे मिळे तुमचा आधार ।

साधकांच्या मनामनात आध्यात्म रुजवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सौ. अर्चना मराठे

श्रीकृष्णा, साधक घालती सतत तुम्हाला साद ।
अत्यंत भावपूर्ण आणि दिव्य मिळे प्रतिसाद ॥ १ ॥

साधक करती तुमची आठवण ।
अंतर्मनी रुजतीय तुमची शिकवण ॥ २ ॥

साधक करती तुमचा धावा ।
सर्व देव तुमच्या रूपातूनच पावे गुरुदेवा ॥ ३ ॥

गुरुदेव, साधक करती तुम्हाला प्रार्थना अन् कृतज्ञता ।
तुमच्यामुळेच मिळे त्यांना परिपूर्णता ॥ ४ ॥

साधक तुमच्यासंगे अंतर्मनी बोलती ।
तुमची प्रतिमा त्यांच्यासंगे राहती ॥ ५ ॥

परात्पर गुरु डॉक्टर तुमच्या सावली मागे साधकांचा धावा ।
साधक तेथे तुम्ही, साधक शोधती सेवेचा मेवा ॥ ६ ॥

गुरुदेव, साधकांसाठी तुमचा महाअवतार ।
जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधनामुळे मिळे तुमचा आधार ॥ ७ ॥

कृतज्ञ कृतज्ञ कृतज्ञ साधक तुमच्या ठाई ।
तुमच्यामुळेच वाढली आमची पुण्याई ॥ ८ ॥

– सौ. अर्चना मराठे, वाळपई, गोवा. (६.७.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF