व्हॅटिकनकडून दूरच्या भागांमध्ये विवाहित पाद्रयांच्या नियुक्तीचा प्रयत्न

कॅथॉलिक चर्चमध्ये फूट पडण्याची शक्यता

  • पाद्रयांकडून होणारे लैंगिक शोषण थांबवता येत नसल्याने व्हॅटिकनकडून अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न होत आहे, असे कोणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • विवाहित पाद्रयांची नियुक्ती केल्याने पाद्रयांकडून होणारे लैंगिक शोेषण थांबेल, असे कसे म्हणता येईल ?

व्हॅटिकन सिटी – दूरच्या काही भागांमध्ये विवाहित पुरुषांना पाद्री बनण्यास अनुमती देण्याच्या सूत्रांवरून व्हॅटिकन चर्चमध्ये वाद निर्माण झाला आहे. या सूत्रावरून कॅथॉलिक चर्चमध्ये फूट पडेल, अशी चेतावणी काही टीकाकारांनी दिली आहे.

१. विवाहित पुरुषांची पाद्री म्हणून नियुक्ती करून ब्रह्मचारी पाद्रयांच्या शेकडो वर्षांच्या जुन्या रूढीला अपवाद निर्माण करण्याच्या ज्वलंत सूत्रावर कॅथॉलिक धर्मगुरूंच्या सभेत चर्चा झाली. याविषयी बिशप एर्विन क्रॉटलर यांनी सांगितले की, सुमारे दोन तृतीयांश बिशपनी धर्मगुरूंच्या पदासाठी विवाहित पुरुषांची नियुक्ती करण्यास पाठिंबा दर्शवला. ‘याला दुसरा पर्याय नाही. त्या प्रदेशातील लोकांची तशी मागणी आहे’, असे ब्राझिलच्या माजी बिशपनी पत्रकारांना सांगितले.

२. अ‍ॅमेझॉन प्रदेश किंवा पॅसिफिक बेटे यांसारख्या दूरच्या भागात विवाहित पुरुषांची पाद्री म्हणून नियुक्ती करण्याच्या सूत्रांवर धर्मगुरूंच्या सभेत चर्चा करावी, अशी सूचना पोप फ्रान्सिस यांनी केली आहे.

३. या धर्मसभेचे अध्यक्ष ब्राझिलचे कार्डिनल क्लावडियो ह्युमीस यांनी सांगितले की, चर्चच्या भवितव्यासाठी नवीन मार्ग शोधतांना विवाहित पाद्री नियुक्त करण्यासारख्या सूत्रावर विचार करण्याची आवश्यकता आहे.

४. काही परंपरावादी धर्मगुरूंनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. कॅथॉलिक चर्चच्या या परंपरेला अपवाद निर्माण केल्यास पुढे एकूणच पाद्रयांच्या ब्रह्मचर्येचे सूत्र संपुष्टात येईल, असा युक्तीवाद त्यांनी केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF