अरुणाचल प्रदेशामध्ये नवरात्रोत्सवाच्या काळात श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची धर्मांधांकडून तोडफोड

हिंदू अल्पसंख्याक असलेल्या अरुणाचल प्रदेशात अशी घटना घडते, हे हिंदू अधिक असुरक्षित झाल्याचेच दर्शक आहे !

(हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

आगरतळा (अरुणाचल प्रदेश) – अरुणाचल प्रदेशातील डोयमुख येथे ५ ऑक्टोबरला रात्री धर्मांधांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आल्याची घटना आता समोर आली आहे. येथे नवरात्रोत्सवानिमित्त डोयमुख बाजार वेल्फेअर कमिटीच्या मंडपात ही मूर्ती स्थापन करण्यात आली होती.

या प्रकरणी पोलिसांनी नबाम अचुमा, नबाम सोनाम आणि ताना चांगरिआंग या तिघांना अटक केली आहे. हे तिघेही ख्रिस्ती आहेत, असे म्हटले जात आहे. ही घटना धार्मिक द्वेषातून झाल्याची चर्चा असली, तरी पोलिसांनी ही घटना वैयक्तिक वादातून घडल्याचे म्हटले आहे. (पोलीस धार्मिक द्वेषातून घटना झाल्याचे कधीही म्हणणार नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक) कमिटीचे अध्यक्ष डोबम रोबी यांनी म्हटले की, अशा प्रकारची घटना प्रथमच घडत आहे. (अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी या घटनेला उत्तरदायी असणार्‍यांवर पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबायला हवे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF