संतांविषयी भाव असलेले आणि हिंदु युवकांचे संघटन करण्यासाठी प्रयत्नरत असलेले रायबाग (बेळगाव) येथील धर्माभिमानी श्री. जयदीप देसाई !

श्री. जयदीप देसाई

‘बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथील धर्माभिमानी श्री. जयदीप देसाई यांनी वेगवेगळ्या हिंदु संघटनांमध्ये उत्तरदायित्व घेऊन कार्य केले आहे. ते हिंदु संघटनांमध्ये सक्रीय राहून आणि स्वतः कृतीशील राहून हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते तन, मन आणि धन यांचा त्यागही करत आहेत. अलीकडे ते हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सक्रीय सहभागी होऊन कार्य करत आहेत. त्यांची काही गुणवैशिष्ट्ये येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

१. स्थानिक दृष्टीने प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याने  समाजातील लोक ‘सावकार’ असे संबोधत असणे

श्री. जयदीपदादा एका प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याने त्या गावातील सर्वजण त्यांना मान देतात. ते वंशपरंपरेने हिंदूसंघटनाच्या कार्यात सहभागी होत आहेत.

२. काविळ रोगासाठी गावठी झाडपाल्याचे औषध निःशुल्क देणे

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे श्री. जयदीपदादांना काही गावठी घरगुती औषधांची माहिती आहे. त्यात विशेषत्वाने ते काविळीसाठी औषध देतात. समाजसेवा या भावाने दादा ते औषध विनामूल्य बनवून देतात.

३. हिंदूंचे संघटन करण्याचा अधिक अनुभव असूनही प्रत्येक गोष्ट विचारून करण्याचा प्रयत्न करणे

श्री. जयदीपदादांना हिंदूंचे संघटन करण्याचा अधिक अनुभव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी विविध संघटनांमध्ये

हिंदूंच्या संघटनाचे कार्य केलेले आहे; परंतु त्यांच्यात त्या अनुभवाविषयी ‘अहं’ नाही. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यपद्धतीप्रमाणे झाले पाहिजे; म्हणून ते प्रत्येक गोष्ट विचारून करण्याचा प्रयत्न करतात.

४. नियोजनकौशल्य

४ अ. हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक रायबागला गेल्यास आगगाडीच्या स्थानकावरून त्यांना घेऊन येण्याचे नियोजन व्यवस्थित करणे : हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक रायबाग केंद्राला भेट देणार असल्यास जयदीपदादा त्यांना आणण्यासाठी आगगाडीच्या स्थानकावर आपल्या कार्यकर्त्यांना गाडीच्या वेळेपूर्वी पाठवतात. त्यांनी पाठवलेले कार्यकर्तेसुद्धा येणार्‍याचे सेवाभावाने स्वागत करतात. त्यांचा भाव बघून आमची गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त होते.

४ आ. परिस्थितीनुसार आवश्यक असे नियोजन करणे : ‘कोणत्या संपर्कासाठी चारचाकी वाहन हवे आणि कोणत्या संपर्कासाठी दुचाकी वाहन हवे’ याचे जयदीपदादा परिस्थितीनुसार नियोजन करतात आणि त्या नियोजनाचा उत्तम परिणामसुद्धा दिसून येतो. यातून ‘त्यांचे सुयोग्य चिंतन आणि समाजाची मानसिकता जाणून घेऊन त्यांचे वागणे’, हे गुण लक्षात आले.

४ इ. हिंदु राष्ट्र-जागृती सभा होण्यासाठी धडपडणे : रायबाग येथील साधक आणि धर्मप्रेमींची संख्या अल्प असूनही श्री. देसाई यांनी हिंदु राष्ट्र-जागृतीच्या मोठ्या सभेचे नियोजन केले होते. गेल्या अनेक वर्षांत तेथे हिंदूंच्या कोणत्याच मोठ्या सभा झाल्या नव्हत्या, तरीही या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमाने २५०० लोक उपस्थित होते.

५. सेवाभाव

५ अ. हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांना दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी बस न मिळाल्याने त्यांना आपल्या मित्राच्या वाहनातून अनुमाने ५० कि.मी. अंतरावरील नियोजित ठिकाणी सोडून येणे : एकदा हिंदु जनजागृती समितीच्या समन्वकांना रात्रीच आणखी एका ठिकाणी जायचे होते; परंतु काही कारणामुळे त्यांना बस मिळाली नाही. तेव्हा श्री. जयदीपदादांनी त्यांना आपल्या मित्राच्या वाहनातून अनुमाने ५० कि.मी. अंतरावरील दुसर्‍या नियोजित ठिकाणी सोडले. त्या वेळी त्यांच्या मनात केवळ सेवाभावच असल्याचे जाणवत होते. ‘आधी सेवा झाली पाहिजे. गुरुदेवांनी मला ही सेवेची संधी दिली आहे’, असे म्हणून ते त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत होते.

६. धर्मप्रेम

६ अ. धर्मशिक्षणवर्गाचे आयोजन करणे : जयदीपदादांनी आपल्या खासगी व्यायामशाळेत धर्मशिक्षणवर्ग घेण्यास प्रारंभ केला आहे. स्थानिक हिंदु संघटनांचे युवक धर्मशिक्षणवर्गाला उत्साहाने येतात. त्या सर्वांनी धर्माचरण आणि नामजप करायला आरंभ केला आहे.

६ आ. व्यायामशाळेत धर्मकार्य करणार्‍या हिंदु युवकांसाठी व्यायामाची निःशुल्क व्यवस्था करणे : जयदीपदादांनी त्यांच्या व्यायामशाळेत धर्मकार्य करणार्‍या हिंदु युवकांसाठी व्यायामाची निःशुल्क व्यवस्था केली आहे. या विषयी त्यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘‘या कारणाने तरी हिंदु युवकांमध्ये धर्मकार्याविषयी आसक्ती निर्माण होऊ दे !’’

६ इ. हिंदूंच्या संघटनाची तळमळ : रायबाग येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाल्यावर ‘हिंदूंचे संघटन करण्यासाठी काही निवडक युवकांना सिद्ध करायला हवे’, असे ते पुनःपुन्हा सांगत असतात आणि त्यानुसार ते प्रयत्नही करतात. त्यासाठी सध्या काही युवकांचे त्यांना साहाय्यही मिळत आहे.

६ ई. इतर हिंदु संघटनांच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना अतिथी म्हणून आमंत्रित करण्याची सूचना देणे : रायबाग येथे हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक गेले असता तेथे हिंदु संघटनेचा कोणताही कार्यक्रम असला, तरी त्या कार्यक्रमाच्या आयोजकांना ते समितीच्या समन्वयकांना अतिथी म्हणून बोलवण्याची सूचना देतात. एकदा शिवजयंतीला शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांना अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. त्या वेळी त्यांनी समितीच्या समन्वयकांशी त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची ओळख करून दिली होती.

७. साधनेची ओढ

हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक रायबागला गेल्यावर जयदीपदादा त्यांच्या घरच्यांना साधनेविषयी सांगण्यासाठी समन्वयकांना त्यांच्या घरी बोलावतात. यावरून जयदीपदादांची साधनेविषयी असलेली आवड आणि ओढ लक्षात येते.

८. भाव

८ अ. सतरा वर्षांपूर्वी झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या दर्शनाचे स्मरण अजूनही असणे : ‘वर्ष २००२ मध्ये एकदा परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांचे मला दर्शन झाले होते’, असे श्री. जयदीप देसाई कृतज्ञतेच्या भावाने सांगतात. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले काय म्हणाले होते ? त्यांनी कोणत्या रंगाची वस्त्रे धारण केली होती ?’, हे सर्व अजूनही त्यांच्या स्मरणात आहे. त्यावरून त्यांचा गुरुदेवांविषयी असलेला भाव लक्षात येतो.’

– श्री. गुरुप्रसाद गौडा, मंगळुरू (२३.६.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF