सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

१. सकारात्मक बोलण्याचा लाभ

‘एकदा सद्गुरु गाडगीळकाकू एका साधकाशी भ्रमणभाषवर बोलत होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी आश्रमात आल्यावर या वेळी चांगले असणार आहे आणि माझ्या सर्व सेवा सुंदर होणार आहेत. तुम्हालाही पुष्कळ आनंद मिळणार आहे.’’ ‘आम्ही या आधी आश्रमात आलो असतांना सद्गुरु गाडगीळकाकूंची प्रकृती चांगली नव्हती आणि या वेळीही त्यांची प्रकृती तितकीशी चांगली नाही, तरी सद्गुरु गाडगीळकाकू भ्रमणभाषवर ‘असे का म्हणाल्या ?’, असे मला वाटले.  नंतर त्या म्हणाल्या, ‘‘मला माझ्याच वाणीचा आशीर्वाद मिळाला आहे; म्हणून देवाने तसे माझ्या तोंडून वदवून घेतले.’’

‘आपले बोलणे नेहमी सकारात्मक आणि उत्साही असल्यास आपल्या वाणीवर विराजमान असलेल्या सरस्वतीची आपल्यावर कृपा होते’, असे माझ्या लक्षात आले.

२. जीवनात घडणार्‍या प्रत्येक लहान-सहान, तसेच चांगल्या-वाईट गोष्टीकडे आध्यात्मिक दृष्टीने पाहणे

एकदा सद्गुरु गाडगीळकाकू स्वतःला कुंकू लावत असतांना त्यांच्या हातातील कुंकवाची डबी खाली पडल्याने भूमीवर कुंकू सांडले. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘भूमीने माझ्याकडून स्वतःची पूजा करून घेतली. काहीतरी शुभकार्य होणार असेल.’’ सद्गुरु गाडगीळकाकू जीवनात घडणार्‍या प्रत्येक लहान-सहान, तसेच चांगल्या-वाईट गोष्टीकडे सहजतेने आध्यात्मिक दृष्टीने पाहतात.

३. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याप्रती साधकांचा भाव

एकदा दौर्‍याच्या वेळी सद्गुरु गाडगीळकाकू एका साधकाच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा त्या साधकांचा ‘देवीच घरी आली आहे’, असा भाव होता.’

–       संग्राहक : श्री. दिवाकर आगावणे, देहली (२७.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF