रामनाथी आश्रमात झालेल्या बगलामुखी ब्रह्मास्त्र यागाच्या वेळी कु. गौरी मुद्गल यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

श्री बगलामुखीदेवी

१. बगलामुखी ब्रह्मास्त्र याग चालू होण्यापूर्वी

कु. गौरी मुद्गल

‘मला बगलामुखी याग कधी चालू होईल ?’, याची उत्सुकता वाटत होती.

२. बगलामुखी याग चालू झाल्यावर

अ. मला आनंद आणि चैतन्य जाणवत होते.

आ. ‘यज्ञस्थळी काढलेल्या रांगोळीतून आम्हाला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले. ‘रांगोळीत काढलेले बाण, म्हणजे देव आमच्यातील एकेक स्वभावदोष नष्ट करत आहेत’, असे मला दिसले.

इ. यागाच्या ठिकाणी ‘सर्व देवदेवता उपस्थित आहेत’, असे मला जाणवले.

ई. ‘महर्षि साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे मला दिसले.

उ. यज्ञस्थळी वानर आले असतांना देवाने सांगितले, ‘मारुतिराया रक्षणासाठी आले आहेत.’

ऊ. यज्ञ चालू असतांना ‘श्रीराम यज्ञस्थळी आले आहेत आणि ते ‘सर्व चांगलेच होणार आहे’, असे मला सांगत असल्याचे जाणवले.

ए. याग चालू झाल्यावर मला चांगले वाटत होते. ‘तेेथून ऊठू नये’, असे मला वाटत होते.

ऐ. मी यज्ञस्थळी नामजप करत असतांना माझे शरीर फार दुखत होते. मला बसणेही शक्य होत नव्हते. तेव्हा मी देवाला शरण गेले. देवाने मला सांगितले, ‘तू यज्ञ चालू असेपर्यंत इथे बसून साक्षात श्रीमन्नारायण यांच्या चरणांवर डोके ठेवले आहे’, असा भाव ठेवून नामजप कर.’ मी भावपूर्ण नामजप केल्यानंतर माझे शरीर दुखायचे थांबले.

ओ. ‘यज्ञस्थळी श्रीमन्नारायण आले आहेत’, असे मला जाणवले.

औ. यज्ञ चालू असतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात मोठा प्रकाश दिसला.

अं. यज्ञ झाल्यावर मला एक महाल दिसला. ‘महालात एका सिंहासनावर परात्पर गुरु डॉ. आठवले बसले आहेत. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ त्यांची पूजा करत आहेत’, असे मला दिसले.

क. मला काही अडचणीमुळे ‘यज्ञस्थळी रांगोळी काढायला जाता आले नाही’, याचे वाईट वाटले. मी हे देवाला सांगितले. काही वेळाने एका साधिकेने  ‘रांगोळी थोडी पुसली गेली आहे. ती नीट करायला जाऊ शकतेस का ?’, असे विचारल्यावर मी लगेच ‘हो’ म्हणाले. तेव्हा ‘देव साधकाला जे आवश्यक आहे, ते देतच असतो’, असे माझ्या लक्षात आले.

३. कृतज्ञता

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे महर्षि आमच्यावर कृपा करत आहेत. महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमात यज्ञ होत आहेत. महर्षींच्या अनंत कृपेमुळे आम्हाला यज्ञाचे चैतन्य ग्रहण करण्याची संधी मिळत आहे. देव आमच्यासाठी पुष्कळ करत आहे. ‘आमची प्रगती व्हावी’, याची काळजी आमच्यापेक्षा देवालाच आहे’, असे वाटते. मी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. गौरी मुद्गल (वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF