बगलामुखी यागाच्या वेळी पुरोहित साधक ‘दिग्बंधन स्तोत्र’ म्हणत असतांना यज्ञकुंडात बगलामुखीदेवीचे अस्तित्व जाणवणे

‘२९.१२.२०१८ या दिवशी रामनाथी आश्रमात बगलामुखी याग होता. त्या वेळी दुपारी १२ वाजता मी यज्ञस्थळी गेले. पुरोहित साधक ‘दिग्बंधन स्तोत्र’ म्हणत असतांना मला यज्ञकुंडात बगलामुखीदेवीचे अस्तित्व जाणवत होते. त्या वेळी ‘देवीच्या अस्तित्वाने सगळ्या दिशांकडील त्रासदायक आवरण नष्ट होत आहे आणि साधकांच्या भोवती संरक्षककवच निर्माण होत आहे’, असे मला १५ मिनिटे जाणवत होते. नंतर मला शांत वाटले आणि हलकेपणा जाणवला. मला हे अनुभवायला मिळाल्याबद्दल परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ – सौ. संगीता चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF