मंत्रपठण करतांना ‘श्री दुर्गादेवी’चे स्मरण होऊन दिवसभरात अनेक वेळा ‘श्री दुर्गादेवी’चे दर्शन होणे

‘२४.६.२०१९ या दिवशी सकाळी मंत्रपठणाच्या शेवटी देवीचे मंत्रपठण करतांना ‘देवीचा मंत्र आपोआप पुष्कळ भावपूर्ण म्हटला जात आहे’, असे मला जाणवले. पठणाच्या १५ मिनिटांच्या कालावधीमध्ये मला देवीचे आर्ततेने स्मरण झाले आणि मला डोळ्यांसमोर पुढील दृश्य दिसले.

श्री. अरुण कुलकर्णी

१. आरंभी ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या समोर ‘श्री दुर्गादेवी’ उभी आहे’, असे दिसले.

२. त्यानंतर रामनाथी आश्रमात झालेल्या कुंकूमार्चन सोहळ्यानंतरचे दृष्य दिसले.

३. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरातील सिंहारूढ ‘श्री दुर्गादेवी’च्या मूर्तीचे दर्शन झाले.

दुसर्‍या दिवशी रामनाथी आश्रमात महाचंडी याग असल्याने यज्ञस्थळी मांडलेल्या पूजेचे दर्शन घेतल्यावर ‘श्री दुर्गादेवी’ची मूर्ती पाहून आनंद झाला आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली. दिवसभर आतून एक वेगळाच आनंद जाणवत होता. माझी साधना होत नसतांनाही देवीचेे दर्शन झाले, त्याविषयी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अरुण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF