गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले ह्यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

पू. अनंत आठवले

कर्मांचे कर्तेपणच सोडण्यास सांगणारा

अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग

२. साधना

ई. अंतर्मुख होऊन इंद्रिये, मन आणि बुद्धी यांचा संयम करून; प्राण-अपान सम करून; इच्छा, भय आणि क्रोध यांचा त्याग करणे (अध्याय ५, श्‍लोक २७ आणि २८)

उ. आसक्ती सोडून आत्मशुद्धीसाठी कर्म करणे. (अध्याय ५, श्‍लोक ११)

३. फळ

अशी साधना करणार्‍याची चित्तशुद्धी होत जाते. कर्मांच्या कर्तेपणाचा आणि फळांचा त्याग केल्याने नैष्ठिकी शांती, म्हणजे ज्ञाननिष्ठेत प्राप्त होणारी मोक्षरूप परम शांती मिळते. (अध्याय ५, श्‍लोक ११ आणि १२)

४. अध्यायाचे नाव ‘कर्मसंन्यासयोग’ असण्याचे कारण

स्वतःला कोणत्याही कर्माचा कर्ता न मानल्याने कर्मसंन्यास झाला. याने चित्तशुद्धी होत जाते आणि यथासमय आत्मज्ञान होऊन मोक्ष मिळतो; म्हणून या अध्यायाचे नाव ‘कर्मसंन्यासयोग’ आहे.                            (क्रमश:)


Multi Language |Offline reading | PDF