दिवाळीमध्ये फटाके फोडू नका ! – केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचे अभिनंदनीय आवाहन

सनातनही गेली अनेक वर्षे या सूत्राविषयी प्रबोधन करत आहे. फटाक्यांमुळे अब्जावधी रुपयांची हानी होण्या समवेतच पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे. वायू आणि ध्वनी प्रदूषण होत आहे. तसेच भारत आर्थिक संकटात असतांना अशी उधळपट्टी योग्य नाही !

नवी देहली – माझा सल्ला आहे की, यावर्षी दिवाळीमध्ये फटाके फोडू नका. मला विश्‍वास आहे की, मुलांना त्यांचे पालक फटाके न फोडण्यासाठी सांगतील. जर ते फटाके विकत घेऊ इच्छित असतील, तर त्यांनी ‘हरित फटाके’ घ्यावेत, असे आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF