काश्मीरमध्ये २०० ते ३०० आतंकवादी सक्रीय ! – पोलीस महासंचालक

केवळ अशी माहिती देणारे नव्हे, तर ‘एकही आतंकवादी भारतात घुसणार नाही आणि घुसलेल्या आतंकवाद्यांना ठार केले’, अशी माहिती देणारे पोलीस हवेत !

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये सध्या २०० ते ३०० जिहादी आतंकवादी सक्रीय आहेत. हिवाळा चालू होण्यापूर्वी पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करून आतंकवाद्यांना भारतात घुसवण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली. आतंकवादी पाकव्याप्त काश्मीरमधून मोठ्या प्रमाणात काश्मीरमध्ये घुसण्यात यशस्वी ठरले आहेत. सुरक्षादलांनी त्यांच्या काही कारवाया उद्ध्वस्तही केल्या आहेत, असेही दिलबाग सिंह म्हणाले. (एवढ्या मोठ्या प्रमाणात आतंकवादी भारतात घुसतात तरी कसे ? राज्यात घुसलेले कितीही आतंकवादी ठार केले; मात्र नवीन घुसखोरी होत राहिली, तर आतंकवाद नष्ट कसा होणार ? – संपादक)

६ ऑक्टोबरला बारामुल्ला येथे जैश-ए-महंमदच्या मोहसिन सालेह नावाच्या एका आतंकवाद्याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता. तो एका पोलिसाची हत्या करण्याचा कट रचत होता.


Multi Language |Offline reading | PDF