चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग ११ ऑक्टोबरला भारताच्या दौर्‍यावर

नवी देहली – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग एका अनौपचारिक संमेलनात सहभागी होण्यासाठी ११ ऑक्टोबरला भारतात येणार आहेत. ते चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. १२ ऑक्टोबरला ते परत चीनला मार्गस्थ होणार आहेत. काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर चीन पाकची बाजू घेत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF