पाकने आतंकवादी आणि त्यांच्या संघटना यांवर कठोर कारवाई केली नाही ! – एफ्.ए.टी.एफ्.

पाक कधीही अशी कारवाई करणार नाही, हे सत्य आहे. त्यामुळे त्याच्याकडून अशी अपेक्षा करणेच चुकीचे होते. आता पाकवर कारवाई करून त्याला आतंकवादी देश घोषित करण्याला पर्याय नाही !

नवी देहली – ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या (एफ्.ए.टी.एफ्.च्या)‘एशिया पॅसेफिक ग्रुप’ने म्हटले आहे, ‘पाकिस्तानने ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव १२६७’ ला लागू करण्यासाठी योग्य पावले उचललेली नाहीत. त्याने संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेले आतंकवादी हाफीज सईद, मसूद अझहर आणि लष्कर-ए-तोयबा, जमात उल दावा यांसारख्या जिहादी आतंकवादी संघटना यांच्यावर कठोर कारवाई केलेली नाही.’ यामुळे फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या पॅरिस येथे १३ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत होणार्‍या बैठकीत पाकला काळ्या सूचीत टाकले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. यापूर्वी पाकला ‘ग्रे’ सूचीमध्ये टाकण्यात आले असून त्याला आतंकवाद्यांवर १५ मासांमध्ये कारवाई करण्यास सांगितले होते; मात्र त्याने या कालावधीत कारवाई केली नसल्याचे वरील माहितीवरून स्पष्ट होत आहे. पाकला काळ्या सूचीत घातल्यावर त्याला कोणत्याही देशाकडून कर्ज मिळणार नाही, तसेच कोणताही देश त्याच्याशी व्यापारी संबंध ठेवू शकणार नाही.


Multi Language |Offline reading | PDF