बांगलादेशमध्ये देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणार्‍या दोघा धर्मांधांना पकडले !

बांगलादेशमध्ये हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

 

ढाका – बांगलादेशच्या लालमोनिरहट जिल्ह्यातील अदिथमारी ठाणा येथे २ ऑक्टोबर या दिवशी श्री राधागोविंद मंदिरातील मूर्तींची २ धर्मांधांनी तोडफोड केली. मूर्ती तोडल्यानंतर पलायन करणारे महंमद नुरुल हक आणि महंमद अब्दुल हक या दोघा धर्मांधांना स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्या दोन्ही धर्मांधांना अटक केली असून अदिथमारी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अध्यक्ष अधिवक्ता (पू.) रवींद्र घोष यांनी अदिथमारी पोलीस ठाण्याचे अधिकारी महंमद सिराजुल इस्लाम यांच्याशी संपर्क साधून ‘मूर्तींच्या तोडफोडीच्या प्रकरणाची चौकशी करा’, अशी मागणी केली. ‘अशा घटना क्लेशदायक असून गुन्हेगारांच्या विरोधात कठोर करण्यात यावी’, अशी मागणी अधिवक्ता (पू.) रवींद्र घोष यांनी या वेळी केली.


Multi Language |Offline reading | PDF