हिंदु जनजागृती समितीच्या देहली, हरियाणा आणि पश्‍चिम उत्तरप्रदेश येथील ऑगस्ट २०१९ मधील धर्मप्रसाराच्या कार्याचा आढावा

१. १५ ऑगस्टच्या कालावधीत होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी देण्यात आलेली निवेदने

‘१५ ऑगस्टच्या कालावधीत होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राज्यशासनाच्या प्लास्टिकच्या वापरावरील बंदीच्या निर्णयानुसार कारवाई करावी’, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली आणि नोएडा येथे २ ठिकाणी अन् फरीदाबाद (हरियाणा) येथे ६ ठिकाणी निवेदने देण्यात आली.

२. जम्मू-काश्मीर येथे लागू असलेले ३७० कलम काढून टाकल्याविषयी आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश केल्याविषयी हिंदु जनजागृती समितीचेे ‘ईश्‍वरचरणी कृतज्ञता आणि केंद्र सरकारचे अभिनंदन’ अभियान !

अ. समितीच्या वतीने चरखी दादरी येथे ६.८.२०१९ या दिवशी अटेला कला येथील शिवमंदिरात भगवान भोलेनाथ आणि पवनसुत हनुमान यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यात आले अन् घंटानाद करून आणि ‘वन्दे मातरम्’ म्हणून आनंद व्यक्त करण्यात आला.

आ. ६.८.२०१९ या दिवशी देहली येथील संतोषी माता मंदिर (अलकनंदा, कालकाजी) येथे श्रीमती मंजुळा कपूर आणि पूणिर्र्मा शर्मा यांनी ३० भक्तांसह ईश्‍वराप्रती कृतज्ञता व्यक्त करून केंद्र सरकारचे अभिनंदन केले. या वेळी घंटानाद करण्यात आला आणि ‘वन्दे मातरम्’चे गायन केले.

इ. फरीदाबाद (हरियाणा) येथील सेक्टर २८ मधील शिव-शक्ती मंदिरात तेथील रहिवाशांसह ‘वन्दे मातरम्’ हे गीत म्हटले आणि प्रशासनाला धन्यवाद दिले.

३. पत्रकांचे वितरण

अ. १५ ऑगस्टला ‘राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा’, यासाठी समितीच्या वतीने समाजात हस्तपत्रकांचे वितरण करून प्रबोधन केले.

आ. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त समितीच्या वतीने ‘श्रीकृष्णाचे पूजन कसे करावे ?’ आणि ‘जन्माष्टमीचे महत्त्व समजून घेऊन त्याचे पावित्र्य सांभाळावे’, या विषयांवरील हस्तपत्रकांचे समाजात वितरण करून प्रबोधन केले.

४. रामराज्याच्या उद्देशाने करण्यात आलेले ‘रामनाम अभियान’ !

४ अ. देहली : देहलीच्या संतोषी माता मंदिर (अलकनंदा, कालकाजी) येथे २.८.२०१९ या दिवशी ‘रामनाम अभियान’ राबवण्यात आले. हे अभियान सायंकाळच्या आरतीनंतर करण्यात आले.

४ आ. फरीदाबाद (हरियाणा) : २०.८.२०१९ या दिवशी फरीदाबाद येथील एस्.जी.एम्. नगर, ब्लॉक सी येथील हनुमान मंदिरात मंगळवारी होणार्‍या कीर्तनाच्या दिवशी ‘रामनाम अभियान’ राबण्यात आले.

४ इ. मथुरा (उत्तरप्रदेश) : २९.८.२०१९ या दिवशी मथुरेच्या अशोका सिटी सोसायटी मंदिरात रामनाम अभियान राबवण्यात आले. येथे प्रतिदिन दर्शनासाठी येणार्‍या भक्तांच्या समवेत रामनाम जपाचे अभियान राबवण्यात आले.

५. रक्षाबंधन

देहली आणि फरिदाबाद येथील अनेक प्रतिष्ठित लोकांना राखी बांधण्यात आली. ‘त्यांना राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करता येण्यासाठी शक्ती आणि बळ द्यावे’, अशी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली.’

– श्री. कार्तिक साळुंके, देहली (सप्टेंबर २०१९)


Multi Language |Offline reading | PDF