सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली नवरात्रोत्सव मंडपामध्ये अजान

  • कोलकाता येथील नवरात्रोत्सव मंडपातील प्रकार

  • मंडपामध्ये चर्च, मशीद आणि मंदिरे यांच्या प्रतिकृती

  • मंडपामध्ये ओम, क्रॉस आणि चांदतारा

एखाद्या मशिदीत किंवा चर्चमध्ये सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली कधी मंत्रोच्चार आणि मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात येते का ? आत्मघाती गांधीगिरीमुळे हिंदू सर्वधर्मसमभावाचा ठेका घेऊन स्वतःचीच फसवणूक करून घेत आहेत !

कोलकाता (बंगाल) – येथील एका नवरात्रोत्सव मंडपामध्ये मंत्रासह अजान वाजवण्यात येत आहे. तसेच मंडपामध्ये चर्च, मशीद, मंदिर यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या असून चांदतारा, ओम, क्रॉस हेही लावण्यात आले आहेत. यातून सर्वधर्मसमभाव दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच सामाजिक माध्यमातून याविरोधात टीका होत आहे. विश्‍व हिंदु परिषद आणि भाजप यांनीही याला विरोध केला आहे.

नवरात्रोत्सवात सहभागी होणार्‍या तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांचा देवबंदच्या उलेमांकडून विरोध

एकीकडे हिंदु सर्वधर्मसमभाव दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे मुसलमान संघटना मुसलमानांना हिंदूंच्या सणांमध्ये सहभागी होण्यास विरोध करतात, हे हिंदूंच्या लक्षात येईल का ?

कोलकात्यामध्ये वरील प्रकारे नवरात्रोत्सव साजरा केला जात असतांना दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां यांनी त्यांचे हिंदु पती निखिल जैन यांच्यासह ६ ऑक्टोबरला येथील एका नवरात्रोत्सवामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्या वेळी त्यांनी नृत्यही केले. याला देवबंदच्या उलेमांकडून विरोध करण्यात आला आहे. (लव्ह जिहादला बळी पडून इस्लामचे पालन करणार्‍या हिंदु तरुणींविषयी देवबंद का बोलत नाही  ? – संपादक) ‘इस्लाम धर्मविरोधी कृती करायच्या असतील, तर नुसरत जहां यांनी स्वतःचे नाव पालटून घ्यावे’, असा सल्ला त्यांच्याकडून देण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF