राजांच्या काळात साजरा होणारा विजयोत्सव !

सध्याच्या काळात दसर्‍याला आपण दाराला तोरण लावतो, एकमेकांना आपट्याची पाने देतो. राजांच्या काळात दसर्‍याच्या भव्य आणि शालीन स्वरूपाचे वर्णन वाचा पुढील शब्दांत…!   पूवीं राजांच्या काळात दसर्‍याच्या दिवशी हत्ती, घोडे यांना स्नान घातले जायचे. त्यांच्यावर भरजरी वस्त्रे आणि अलंकारही चढवले जायचे. त्यांना भव्य राजवाड्यासमोर आणले जायचे. मग सिंहासनाची पूजा व्हायची. राजे लव्याजम्यासह सीमोल्लंघनाला निघायचे. आधी स्वस्तीवाचन व्हायचे. मिरवणुकीसमवेत रणवाद्येही असायची. राजा शस्त्रसज्ज होऊन हत्तीवर अंबारीत वा घोड्यावर बसून निघायचा. मार्गावरील देवतांची पूजा व्हायची. शमीवृक्षाजवळ पोचल्यावर शमी वृक्षाची, अपराजितेची पूजा व्हायची. ‘अपराजिता’ देवी मला विजय देवो’, अशी प्रार्थना राजा करायचा, तसेच शमीची प्रार्थना करून राजा खड्ग घेऊन पूर्वेकडून प्रारंभ करून अष्टदिशांना काही पावले चालायचा. इंद्रादी देवांना नमस्कार करून चतुरंग सेनेचे संचलन व्हायचे. जयघोषात मिरवणूक राजवाड्याच्या महाद्वारात आल्या सुवासिनी शास्त्रोक्त पद्धतीने ओवाळायच्या. नंतरच राजा राजवाड्यात प्रवेश करायचा. त्या वेळी मंत्रोच्चार, आशीर्वचने व्हायची.

(संदर्भ : संकेतस्थळ)


Multi Language |Offline reading | PDF