हिंदूंनो, विजयादशमी म्हणजे दसरा असा साजरा करा ।

श्री. द.र. पटवर्धन

हिंदूंनो, विजयादशमी म्हणजे दसरा ।
असा साजरा करा ॥ १ ॥

वि – विजय अहं-स्वभावदोषांवर नित्य होण्यासाठी ।
सदैव साधनारत रहा ॥ २ ॥

ज – जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून शीघ्रतेने सुटण्या ।
गुरुकृपायोगानुसार साधना करा ॥ ३ ॥

या – ‘यावत्चंद्रदिवाकरौ’ टिकणार्‍या ।
धर्मकार्यात अग्रणी रहा ॥ ४ ॥

द – दशहरा म्हणजे दशमुखी रावणाचा वध ।
करणार्‍या श्रीरामाचे परमभक्त व्हा ॥ ५ ॥

श – शहाणपणा अंगी येण्यासाठी ।
सत्संगात राहून सदाचरण करा ॥ ६ ॥

मी – मीपणा सत्वर जाण्यासाठी ।
सदा ईशचिंतनी दंग व्हा ॥ ७ ॥

निरंतर सर्वोच्च आनंद मिळण्यासाठी ।
असंख्य साधक-सज्जनांना भेटून आनंदरूपी सोने लुटा ॥ ८ ॥

– आपला सर्वांचा कृपाभिलाषी,

श्री. द.र. पटवर्धन, माणगाव, जिल्हा सिंधुदुर्ग. (२२.९.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF