विजयादशमी

इच्छा ही एकच उरी ।
सोने हे घेऊनी हाती धरी ॥ १ ॥

करू प्रतिज्ञा, सुवर्णभूमी व्हावी भारतभूमीची ।
आज वाटूया सुवर्णासम पाने ही शमीची ॥ २ ॥

विजयोत्सवाचा महाभारती होता हा दिन ।
२०२३ वर्षी कलियुगी येऊ दे असाच विजयदिन ॥ ३ ॥

देव याची देतो पुनःपुन्हा आठवण ।
या आठवणीची मनी करूया नित्य साठवण ॥ ४ ॥

– पुष्पांजली, बेळगाव (२१.१०.२०१५, दुर्गाष्टमी)


Multi Language |Offline reading | PDF