शक्तीची उपासना आवश्यक !

संपादकीय

पाली, राजस्थान येथे नवरात्रीच्या मंडपात काही धर्मांधांनी घुसून गरबा खेळणार्‍या मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी तेथे उपस्थित हिंदूंनी विरोध केल्यावर त्यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण करून त्यांना गंभीर घायाळ केले. काहींची डोकी फोडली, तर काहींच्या हातावर हत्याराने वार केले. देवीच्या मूर्तीची मोडतोड करण्यात आली. त्यामुळे स्थानिक भयभीत झाले आहेत. स्थानिकांचे म्हणणे आहे की, येथे धर्मांध येऊन मुलींची छेड काढतात, रात्री गांजा आणि अमली पदार्थ यांचे सेवन करतात आणि मुलींच्या छेडछाडीला विरोध केल्यावर घरात घुसून हिंदूंना मारतात. राजस्थानमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने उभारलेल्या मंडपात झालेली ही घटना निषेधार्ह आहे. हिंदूंचे म्हणणे आहे की, धर्मांधांकडून हिंदु मुलींच्या छेडछाडीच्या घटना होत असतात. याचा स्पष्ट अर्थ राजस्थानमधील काँग्रेस सरकार हिंदूंच्या हितरक्षणार्थ काही कृती करत नाही, असा होतो. नवरात्रीच्या काळात मंडपात घुसून हिंदु मुलींची छेडछाड, हत्यारांनी हिंदूंवर आक्रमण होणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देवीच्या मूर्तीची मोडतोड होणे यांमुळे तळपायाची आग मस्तकात गेल्यावाचून राहत नाही.

मोहरम अथवा अन्य धर्मियांच्या सणांमध्ये अशी घटना घडली असती, तर एव्हाना देशभर दंगली होऊन आगडोंब उसळला असता आणि प्रसारमाध्यमांनी त्याची तात्काळ नोंद घेतली असती. राजस्थान आणि त्यातही पाली काही पुष्कळ दूरचा जिल्हा नाही. तरीही या घटनेविषयी प्रसारमाध्यमे एवढी चिडीचूप का आहेत ? एरव्ही हिंदूंना असहिष्णुतेचे डोस पाजणारे, अखलाखच्या हत्येनंतर आणि जमावाने मारहाण केल्याच्या घटना घडल्यानंतर देशात असुरक्षित वातावरण जाणवणारे आता झोपले का आहेत ? केवळ मुसलमान, ख्रिस्ती यांच्यासाठीच ते जागरूक असतात का ? ३ वर्षांपूर्वी भिवंडी येथे मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांधांनी नवरात्रीची कमान तोडली होती. बिहार येथेही त्याच कालावधीत श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जनाच्या मिरवणुकीवर मोहरमच्या मिरवणुकीतील काही धर्मांधांनी आक्रमण केले होते. या वेळी आजूबाजूच्या दहाहून अधिक दुकानांची हानी केली होती, तर काही पोलिसांनाही त्यांनी घायाळ केले होते.

हिंदूंची संरक्षण पथके हवीत !

स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताकदिन या राष्ट्रीयदिनांच्या वेळी आतंकवादी भारतावर आक्रमण करण्याच्या धमक्या देतात. तेव्हा सुरक्षादलांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले असतात. अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था केलेली असते. आतंकवाद्यांच्या पाठिराख्यांची धरपकड केली जाते जेणेकरून राष्ट्रीयदिन शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणात पार पडतील. तोच भाग हिंदु सणांच्या वेळी का लागू केला जात नाही ? बहुसंख्य हिंदूंच्या देशात गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, रामनवमी, हनुमान जयंती हे हिंदूंचे उत्सव भयाच्या वातावरणात साजरे करावे लागतात. मिरवणुकांवर मोहल्ल्यातून, मशिदींतून दगडफेक होतेच.

गणेशोत्सवाच्या वेळी मोहल्ला कमिटीच्या बैठका होतात. हिंदू आणि मुसलमान दोघांच्या बैठका घेतल्या जातात. प्रत्येक वेळी धर्मांध कुरापती काढत असतात आणि त्याचे पर्यवसान मोठ्या हाणामारीत होते. तरीही हिंदूंना समजावण्याचे कारण काय ? कि हिंदूंनी काहीही झाले तरी शांत रहावे, यासाठी सर्व खटाटोप असतो ? पोलीस अनेक ठिकाणी पोचू शकत नाहीत अशीही स्थिती असते. हिंदूंच्या देवतेची आणि तेही भर उत्सवात मूर्ती तोडण्याचे प्रकार हिंदूंचा वंशसंहार करणार्‍या बांगलादेशात होतात, ते भारतात घडू लागणे हे कशाचे लक्षण आहे ? काँग्रेसशासित राज्यांमध्ये हे प्रकार अधिक प्रमाणात चालू असतात. त्याचे कारणही स्पष्ट आहे. धर्मांधांना काँग्रेसचा नेहमीच छुपा पाठिंबा राहिला आहे आणि ‘त्यांना सोडून हिंदू कसे आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहतील’, याचीच काळजी काँग्रेसने घेतली आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे शासन सत्तेवर आल्यावर तेथील एका गावात धर्मांधांकडून स्थानिक हिंदूंवर आक्रमण झाले. तेव्हा तेथील हिंदूंनी माध्यमांसमोर बोलतांना सांगितले ‘‘आता काँग्रेसचे शासन आल्यामुळे आम्हाला धर्मांधांच्या अत्याचारांना सामोरे जावे लागेल.’’ या हिंदूंच्या वक्तव्यातच सर्व आले.

हिंदूंनी या उत्सवांच्या काळात तात्पुरते संरक्षण पथक बनवण्याचा विचार का करू नये ? घटना घडून गेल्यानंतर येणारे पोलीस आणि नंतर प्रत्यक्ष शिक्षेची कार्यवाही यामध्ये पुष्कळ वेळ निघून जातो. तोपर्यंत पुढील उत्सव येतात आणि त्या वेळीही पुन्हा धर्मांधांकडून आगळीक केली जाते. हिंदु युवकांची या काळात संरक्षण पथके सिद्ध करून त्यांना पोलीस आणि प्रशासन यांनीही पाठिंबा द्यावा. त्यांना धर्मांधांची आगळीक कशी हाताळायची याचे प्रशिक्षण दिले जावे, जेणेकरून उत्सवकाळात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडणार नाही.

तृणमूल काँग्रेसचे सरकार असलेल्या बंगालमधील कोलकाता येथील नवरात्री मंडळाने तर नवरात्रात अजानचा कार्यक्रम ठेवला. त्याविषयी एका जागरूक अधिवक्त्याने तक्रार पत्र लिहिले आहे. मुंबईत गणेशोत्सवात मंडपामध्ये नमाजपठण करण्यात आले. मशिदीमध्ये कधी हिंदूंना प्रार्थना करण्यास बोलावतात का ? ही गांधीगिरी का करण्यात येते ? कोलकाता येथील अधिवक्त्याने ‘नवरात्रीच्या मंडपात अजानचा कार्यक्रम ठेवल्यामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते आणि हिंदूंच्या उत्सवाचे पावित्र्य भंग होऊ शकते. त्यामुळे मंडपात अजानची अनुमती देणार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात यावा’, अशी मागणी केली आहे. तात्पर्य काय हिंदूंच्या उत्सवांना गालबोट लावणारे धर्मांध, काँग्रेस आणि सर्वधर्मसमभावी हिंदूच आहेत. त्यामुळे हिंदूंनी शक्तीची उपासना करणे, ही काळाची आवश्यकता आहे.


Multi Language |Offline reading | PDF