ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगम असलेले ‘सनातन पंचांग’ घरोघरी पोचवा !

साधकांना सूचना आणि कृतीशील धर्मप्रेमींना नम्र विनंती !

राष्ट्रीय अस्मिता वृद्धींगत करणारे आणि राष्ट्रहिताचा दृष्टीकोन देणारे विचारधन म्हणून अनेक धर्मप्रेमींनी ‘सनातन पंचांगा’चा गौरव केला आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणारे, तसेच धर्मरक्षणाविषयी प्रबोधन करणारे हे पंचांग एकमेवाद्वितीय आहे. या पंचांगातील बहुमूल्य ज्ञानामुळे जिज्ञासूंमध्येही साधनेची रूची निर्माण होत आहे. चैतन्याचा स्रोत असणारे हे पंचांग ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगमच आहे.

अधिकाधिक हिंदूंंपर्यंत हे पंचांग पोचणे आवश्यक आहे. पुढील वर्षीचे (वर्ष २०२० चे) पंचांग आता उपलब्ध झाले असून प्रतीवर्षीप्रमाणे हे पंचांगही सर्वांगसुंदर आणि परिपूर्ण आहे. सर्वत्रचे साधक आणि कृतीशील धर्मप्रेमी यांनी पंचांग वितरणासाठी पुढील प्रयत्न करावेत.

१. आप्तेष्ट आणि परिचित यांच्यापर्यंत ‘सनातन पंचांग’ पोचवणे

आप्तेष्ट, परिचित आणि स्नेही यांना पंचांगांची माहिती सांगून पंचांग विकत घेण्यास उद्युक्त करता येईल. वाढदिवस, शुभविवाह, वास्तूशांत आदी शुभप्रसंगी इतरांना सनातन-निर्मित सात्त्विक पंचांग भेट देता येईल.

२. संपर्कात असलेले हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना पंचांग वितरित करणे

अ. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे वाचक, हितचिंतक, अर्पणदाते, विज्ञापनदाते, तसेच धर्मप्रेमी यांना पंचांगाचे महत्त्व सांगून ते विकत घेण्याची विनंती करावी. त्यांना त्यांचेे नातेवाईक, स्नेही आदींनाही पंचांग विकत घेण्यासाठी प्रवृत्त करण्यास सांगावे.

आ. संस्था आणि समिती यांच्या कार्याशी संलग्न झालेले बरेच हिंदुत्वनिष्ठ स्वयंप्रेरणेने विविध उपक्रमांत सहभागी होत आहेत. त्या हिंदुत्वनिष्ठांनाही पंचांग वितरणाच्या सेवेद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची विनंती करावी.

३. सार्वजनिक ठिकाणी पंचांग वितरित करणे

अ. शासकीय कार्यालये, अधिकोष, पतसंस्था, आस्थापने, शाळा येथे (जेवणाच्या सुटीत) जाऊन तेथील कर्मचार्‍यांना पंचांगाची माहिती सांगण्याविषयी व्यवस्थापकांची अनुमती घ्यावी. तेथे प्रभावीपणे विषय मांडून पंचांग वितरण करावे.

आ. रुग्णालय, उपाहारगृह आदी वर्दळीच्या ठिकाणी, अधिवक्ता, आधुनिक वैद्य, सनदी लेखापाल (सी.ए.) या व्यावसायिकांकडे, तसेच केशकर्तनालये, सौंदर्य-वर्धनालये (ब्युटी पार्लर), शिकवणीवर्ग आदी ठिकाणी पंचांग विकत घेण्याची विनंती करू शकतो.

इ. शाळा, महाविद्यालये यांसह शासकीय आणि खासगी वाचनालयांमध्ये पंचांग वितरण करता येईल.

ई. युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, तसेच महिला विविध संघटनांच्या माध्यमांतून (प्रतिदिन) एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यांना पंचांग विकत घेण्यासाठी प्रवृत्त करावे.

उ. बस, रेल्वे आदी सार्वजनिक वाहनाने प्रवास करत असतांना समवेत पंचांग ठेवून सहप्रवाशांना ते वितरित करता येईल.

४. सामाजिक संकेतस्थळांच्या (‘सोशल मिडिया’च्या) माध्यमातून पंचांगांचे महत्त्व बिंबवणे

www.sanatanshop.com, www.Sanatan.org आणि www.Hindujagruti.org यांच्या ‘फेसबूक’, तसेच ‘ट्विटर’ या खात्यांवरून पंचांगांचा प्रसार करणार्‍या ‘पोस्ट’ केल्या जातात. त्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘फेसबूक’ आणि ‘ट्विटर’ यांद्वारे अधिकाधिक जणांना ‘शेअर’ कराव्यात. हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना त्या पोस्ट पाठवून त्यांच्या संबंधित गटांना, तसेच संपर्कातील व्यक्तींना पाठवण्याविषयी आवाहन करू शकतो.

५. सण-उत्सवांच्या निमित्ताने पंचांग सर्वदूर पोचवणे

५ अ. नवरात्रोत्सव मंडळांच्या प्रमुखांना पंचांगाविषयी अवगत करणे : नवरात्रोत्सव मंडळांच्या प्रमुखांना भेटून सनातन पंचांग दाखवावे अन् ते विकत घेण्याची विनंती करावी. मंडळाला विविध प्रसंगी साहाय्य करणार्‍या वर्गणीदारांना पंचांग भेट देण्यास, तसेच मंडळात आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेते आणि सहभागी स्पर्धक यांना पारितोषिक म्हणून पंचांग देण्यास सुचवू शकतो.

५ आ. व्यावसायिकांना भेटून दीपावलीच्या निमित्ताने ग्राहकांना सनातन पंचांग भेट देण्यास उद्युक्त करणे : दीपावलीच्या निमित्ताने अनेक आस्थापने, सुवर्णालंकार बनवणारे व्यावसायिक, कापड विक्रेते, तसेच ‘शॉपिंग मॉल्स’, ‘सुपर बझार’ यांचे मालक ग्राहकांना एखादी भेटवस्तू देतात, तसेच कारखानदार त्यांच्या कर्मचार्‍यांना भेट देतात. या सर्वांची भेट घेऊन ‘सर्वार्थांनी उपयुक्त असलेले सनातन पंचांग त्यांनी इतरांना भेट म्हणून देऊन धर्महित आणि राष्ट्रहित साधावे’, यासाठी साधकांनी त्यांना प्रवृत्त करावे.

६. पंचांग विक्रीसाठी कक्ष उभारण्याचे नियोजन करा !

‘सनातन पंचांग’ कक्ष शक्य होईल तेथे लावावा. या कक्षावर सनातन पंचांगाचे वैशिष्ट्य सांगणारे फलक लावू शकतो. (बर्‍याच जिल्ह्यांत हे फलक उपलब्ध आहेत. ज्या जिल्ह्यांना या फलकाची कलाकृती हवी असेल, त्यांनी नेहमीच्या वितरण प्रणालीवरून घ्यावी.)

पंचांग कक्ष लावता येईल, अशी काही ठिकाणे पुढे दिली आहेत.

अ. हिंदूसंघटन मेळावे, हिंदु राष्ट्र-जागृती सभा, अधिवेशने आदी कार्यक्रमांत पंंचांगांच्या विक्रीसाठी निराळा कक्ष उभारावा.

आ. गर्दी असणार्‍या मंदिरांचा परिसर, बसस्थानक, शहरातील मुख्य चौक, मोठी उद्याने आदी सार्वजनिक ठिकाणे

इ. दिवाळीच्या निमित्ताने लावण्यात येणारी ग्रंथ-प्रदर्शने, तसेच नियमित ग्रंथ-प्रदर्शनाची ठिकाणे

ई. साधक, धर्मप्रेमी, तसेच संपर्कातील हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडे होणारी शुभकार्ये

उ. मुंबई, पुणे आदी मोठ्या शहरांमध्ये ‘दिवाळी पहाट’सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा ठिकाणी पंचांग वितरणाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

ऊ. धर्मप्रसाराच्या अंतर्गत विविध उपक्रम (उदा. धर्मशिक्षणवर्ग, धर्मप्रेमींची बैठक) आदींच्या माध्यमातून पंचांगाविषयी जागृती करता येईल.

७. पंचांग प्रायोजित होण्यासाठी समाजात संपर्क करा !

अ. या पंचांगात अधिक प्रमाणात देवता तत्त्व असलेली देवतांची चित्रे आहेत.

आ. या वर्षीच्या पंचांगात अक्कलकोट येथील स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांचीही छायाचित्रे अंतर्भूत करण्यात आली आहेत. भक्तांना याविषयी अवगत करून पंचांग प्रायोजित करण्यास वा विकत घेण्यास उद्युक्त करता येईल.

इ. पंचांगासाठी प्रायोजक मिळवण्याच्या दृष्टीने मागील वर्षीच्या प्रायोजकांच्या सूचीसह या वर्षी संपर्कात आलेल्या हितचिंतकांच्या नवीन सूचीचाही अभ्यास करावा. वाचक, हितचिंतक, तसेच राष्ट्रप्रेमी हिंदू यांना पंचांग प्रायोजित करण्यासाठी उद्युक्त करावे.

सर्वत्रच्या साधकांनो, समाजात काना-कोपर्‍यापर्यंत चैतन्यदायी पंचांग पोचवून गुरुकृपा संपादन करा !         


Multi Language |Offline reading | PDF