आनंदी पिंडी ते आनंदी ब्रह्मांडी ।

प्रत्येक साधकाला आनंद मिळवून देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

    आजपर्यंत आश्रमात अनेक यज्ञ झाले. यज्ञामुळे आश्रमातील वातावरण चैतन्यदायी आणि आनंदी झाले आहे. त्यामुळे माझे मनही पुष्कळ आनंदी होऊन मी आनंदातच बुडून गेलो आहे. हा आनंद अनुभवतांना ‘रामराज्यास आरंभ झाला आहे’, असे वाटते. या वेळी पिंडी ते ब्रह्मांंडी आनंदाची अनुभूती येते. हे सर्व श्रेय करता करविता परम पूज्य गुरुमाऊलीचे आहे.

श्रीरामप्रसाद विठ्ठल कुष्टे

आजी आनंदले हे मन । जाहले गुरुचरणदर्शन ।
आजी आनंदले हे कर्ण । ऐकिले गुरूंचे संकीर्तन ॥ १ ॥

आजी आनंदले हे कर । करीती गुरुचरणी नमस्कार ।
आजी आनंदली ही पावले । की गुरुआश्रमी दावले ॥ २ ॥

आजी आनंदली उदरजठर । जाहला गुरुप्रसाद ग्रहण ।
आजी आनंदली जीभ । होत असे गुरूंचे नामस्मरण ॥ ३ ॥

आजी आनंदले नयन । जाहले गुरूंचे मानस दर्शन ।
आजी आनंदले हृदय । धडकते गुरूंच्या नामात ॥ ४ ॥

आजी आनंदली ही त्वचा । रोमरोमावर होत असे वर्षाव चैतन्याचा ।
आजी आनंदले हे रक्त । वाहते गुरुकृपे चरणामृत शरिरात ॥ ५ ॥

आजी आनंदल्या पेशी । म्हणती आम्ही मिसळलो गुरुचरण धुळीसी ।
आजी आनंदले घरविश्राम । जाहला गुरूंचाच आश्रम ॥ ६ ॥

आजी आनंदली ही हवा ।
मिसळतो क्षणोक्षणी गुरूंचा श्‍वास उच्छवास चैतन्य नव नवा ।
आजी आनंदली ही भूमी ।
गुरुमाऊली सदा देई आनंदाची आम्हा सावली ॥ ७ ॥

आजी आनंदले तत्त्व आप । भरले गुरुचैतन्य आपोआप ।
आजी आनंदले हे आकाश ।
उघडले गुरुकृपे मोक्षद्वार सावकाश ॥ ८ ॥

आजी आनंदले हे नीर । म्हणते गुरुचरण पूजनेसी जाहलो अधीर ।
आजी आनंदले हे तेज ।
म्हणाले मिसळते आम्हात गुरूंचे चैतन्य सतेज ॥ ९ ॥

आजी आनंदले हे ब्रह्मांड । चालले सगळे चैतन्याचेच कर्मकांड ।
आजी आम्ही अनुभवतो आनंद पिंडी ।
आणि दिसतो आनंद ब्रह्मांडी ॥ १० ॥

– श्रीरामप्रसाद विठ्ठल कुष्टे, ढवळी, फोंडा, गोवा. (१८.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF