देवद आश्रमातील साधिका सौ. मीना खळतकर यांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची मानसपूजा करतांना स्फुरलेल्या आरती !

सौ. मीना खळतकर

‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद येथील सनातन आश्रमात आल्या होत्या. एके दिवशी त्या भोजनकक्षात महाप्रसाद घेत असतांना मला त्यांचे दर्शन झाले. तेव्हा मी त्यांना लांबूनच नमस्कार केला आणि खोलीत गेल्यावर मी सद्गुरु बिंदाताई यांची मानसपूजा करून आरती केली. तेव्हा माझ्या ओठांवर ‘ओवाळिते आई तुज जगत्जननी माऊलीला ।’ ही ओळ पुनःपुन्हा येत होती. त्यानंतर २ दिवसांनी मला स्फुरलेल्या पुढील आरती सद्गुरु बिंदाताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी अर्पण करते.

जगत्जननी माऊलीची आरती

कृतज्ञतापुष्प अर्पण करूनी लोटांगण घालिते आई तव चरणी ।

ओवाळिते आई, जगत्जननी माऊली तू ॥ धृ. ॥

भवानी तू, चंडिका तू ।

महालक्ष्मी तू, महाकाली तू ।

भूदेवी तू, नवदुर्गा तू ।

सोनियाच्या पावलांनी देवद आश्रमी आलीस तू ॥ १ ॥

स्वभावदोषरूपी राक्षसांना नष्ट करण्यास आलीस तू ।

देई सुबुद्धी या लेकरांना तू ।

अपेक्षित तुजला वागण्यासी बळ दे माते तू ।

धन्य झालो आम्ही साधकजन,

आमची उन्नती करण्यास आलीस तू ॥ २ ॥

श्री महालक्ष्मीची आरती

आज आनंदाने गाते माते, आज आनंदाने गाते माते ।

महालक्ष्मी तुझी मी आरती करिते ॥ धृ. ॥

सूर गं लावते, ताल मी साधते ।

तुझ्या प्रेमात गं मी न्हाते ।

महालक्ष्मी तुझी मी आरती करिते ॥ १ ॥

तुझ्या दर्शना मी व्याकुळ झाले ।

चरणांवरी सदा तुझ्या पडूनी मजला राहू दे ।

दर्शन दे माते, आता मज तू दर्शन दे ॥ २ ॥

‘महालक्ष्मी’ आली घरी, मज दिवाळीच भासते ।

चैतन्य सर्वत्र विखुरते, सर्वांना ती आनंदी करते ।

ही घडी मजला अनमोल वाटे  ।

आनंदे महालक्ष्मी तुझी मी आरती करिते ॥ ३ ॥’

– सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.९.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF