शरणागत आई तुझ्या चरणी, दर्शनाला आलो आज ।

श्री. सुमित सागवेकर

आई तुझे अस्तित्व शोभते रामनाथीच्या पावन भूमीवरी ।

रामनाथीत गुरुचरणी, कृपेच्या बरसतात सरी ।

शरणागत आई तुझ्या चरणी, दर्शनाला आलो आज ।

दर्शन दे आम्हास आता, घेऊनी दुर्गारूपाचा साज ॥ १ ॥

तुझ्या दर्शनास येतांना, आई नाव तुझे मुखात ।

आमचे भान सारे हरपले, तुझे रूप भरले डोळ्यांत ।

आलो पायाशी आई तुझ्या, आता घे आम्हा पदरात ।

दर्शन दे आम्हास आता, घेऊनी कालीरूपाचा साज ।

घेऊनी दुर्गारूपाचा साज ॥ २ ॥

तुझ्या दर्शनाला भक्त तुझे, दुरून येतात या भूमीवर ।

साधनेतील अडचणी दूर होती, सार्‍या भक्तांचा तू आधार ।

तुझ्या नावाने नाव डुलते, या भक्तीच्या सागरात गं ।

दर्शन दे आम्हास आता, घेऊनी अंबारूपाचा साज गं ।

घेऊनी दुर्गारूपाचा साज ॥ ३ ॥

इच्छा आहे प्रतिवर्षीची, जन्मदिनी माते तुझ्या गं भेटीची ।

कृतज्ञतेची ओटी भरूनी, नवसरूपी प्रार्थना करी आध्यात्मिक उन्नतीची ।

रामनाथीत आनंदाचे उधाण येते, भाद्रपद अमावास्येचा तो दिस ।

दर्शन दे आम्हास आता, घेऊनी भवानीरूपाचा साज ।

घेऊनी दुर्गारूपाचा साज ॥ ४ ॥

 शरणागत आई तुझ्या चरणी, दर्शनाला आलो आज ।

दर्शन दे आम्हास आता, घेऊनी दुर्गारूपाचा साज ॥ ५ ॥

– गुरुमाऊलीचा श्री. सुमित सागवेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.९.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF