वसई येथे ख्रिस्ती पाद्रीकडून तरुणीवर वर्षभर अत्याचार

लोकहो, ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ओळखा !

वसई (जिल्हा पालघर) – कौटुंबिक अडचणी दूर करून जीवनात आनंद निर्माण करून देतो, असे सांगून ग्लेन सुभाष डिक्रूज (वय ४० वर्षे) या ख्रिस्ती पाद्रीने येथील २१ वर्षीय तरुणीवर वर्षभर अत्याचार केला. या प्रकरणी पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार वसई पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद करून डिक्रूज याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात उपस्थित केले असता १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पीडित तरुणी मागील वर्षभरापासून कौटुंबिक समस्येने मानसिकदृष्ट्या त्रस्त होती. ही संधी साधून डिक्रूज तिच्याशी जवळीक साधत दुष्कृत्य करत राहिला. ‘घडलेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास गुरूंचा प्रकोप होऊन तुला त्रास होईल’, असे त्याने तिला धमकावले होते. (विविध प्रकारची प्रलोभने दाखवून जवळीक निर्माण करणार्‍या ख्रिस्ती पाद्रींपासून सावधान ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF